आमचा कॉम्रेड दादामामा.....!!
""वैयक्तिक जीवन क्षणभंगुर असते, पण मानवता चिरंतन आहे.... "
- कॉम्रेड कै. श्री. ल. पुरोहित ( "... आत्मकथन"- पृष्ठ क्र. २१७)
---------------------------------------------------------------------------------------
खरं सांगायचं तर आज मी एका आभाळाएव्हढ्या व्यक्तिमत्वाला चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्यांचं नांव आहे कॉम्रेड श्रीराम लक्ष्मण पुरोहित !! तो माझा सख्खा मामा होता, हे लिहिताना मला खूप अभिमान वाटतो. चिमटीत पकडण्याचा एव्हढा अट्टाहास तरी का असं कुणी म्हणेल. पण आजचा दिवसच तसा आहे. आज १ मे - म्हणजे कामगार दिन ! ह्या दिवशी आमच्या कॉम्रेड मामाचे स्मरण आम्हां सर्वांना झाले नाही तरच नवल. कम्युनिझमच्या इतिहासाचा आणि मूलभूत तत्वांचा सांगोपांग अभ्यास करून ती प्रत्यक्षात आणणाऱ्या केवळ मोजक्या भारतीय कामगार नेत्यांमध्ये मामाचं स्थान खूप वरचं आहे. कामगार चळवळीच्या कुरुक्षेत्रावरील हा शूर योद्धा १८ जानेवारी २०१३ रोजी निवर्तला. त्यावेळी तो ८७ वर्षाचा होता. त्याच्या आयुष्यभराच्या अथक प्रयत्नांनी आणि परिश्रमांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील अनेकांचे (म्हणजे कामगार, आदिवासी, शेतकरी वर्ग यांचे ) जीवन सुसह्य झाले. आजकाल काही बारीक सारीक काम केले कि वृत्तपत्रांत ते छापून आणण्यासाठी अगदी चढाओढ लागलेली असते. माध्यमे हे तर राजकारण्यांचे मोठेच अस्त्र आहे. प्रसिद्धीची अभिलाषा कधीच न बाळगणाऱ्या पुरोहितांनी माध्यमांची, स्तुतीची किंवा मोबदल्याची कधीच फिकीर केली नाही. अत्यंत निःस्पृह वृत्तीने त्याने कष्टकरी वर्गाची सेवा केली. तरीही सामान्य जनमानसात तो अज्ञात राहिला. He remained an Unsung Hero!!
आम्ही त्याला दादामामा म्हणायचो. आम्हां कुटुंबीयांचा तो मेरुमणी होता, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. दादामामाच्या नुसते जवळ बसल्यानेसुद्धा मला कुठल्यातरी चुंबकीय क्षेत्रात असल्यासारखे वाटे. तसे का वाटे, हे मात्र मला त्या काळी सांगता आले नसते. त्याने लिहिलेले ५०० पानांचे आत्मकथन वाचल्यावर ह्या कोड्याचे उत्तर आता मला गवसले आहे असे मी म्हणू शकतो. वास्तविक त्याचा सहवास मला लाभावा असे मला नेहमीच वाटे. पण काही कारणांनी तसे झाले नाही. तो जायच्या आधी दहाएक वर्षाच्या काळांत आम्ही जेव्हा १५ दिवसांच्या सुट्टीवर दुबईहून ठाण्याला यायचो, तेव्हा आम्ही उरणला जावून मामा-मामीला भेटत असु (आणि मामादेखील आमच्या येण्याकडे डोळे लाऊन बसायचा). २०१२ च्या मे महिन्यात आम्ही असेच चांगला वेळ घेवून गेलो होतो. त्यामुळे त्याचे ३० मिनिटांचे एक व्हिडीओ शूटिंग मी घेवू शकलो. हीच काय ती आमच्या दृष्टीने त्याची जिवंत स्मृती !!
मामाचे " आरोपी क्रमांक १" हे आत्मकथन-वजा पुस्तक या लेखाचा प्रमुख आधार आहे, आपल्यापैकी काही जणांनी हे पुस्तक कदाचित वाचलेही असेल. या पुस्तकात त्याच्या लहानपणापासूनचा सर्व इत्यंभूत वृत्तांत आहे . त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व कसे कसे विकसित होत गेले, किंवा त्याने आयुष्यभर जपलेली मूल्ये व त्यांचा उगम या सर्वांचा यथोचित उलगडा होतो. विषयानुरूप त्याविषयी थोडा गोषवारा इथे येईलच.
पाळण्यात असतानाच कोकणातील एका ज्ञानी ज्योतिषाने त्याच्या आईला ( म्हणजे माझ्या आजीला ) म्हणे भविष्य वर्तविले होते कि " हा मुलगा पुढे सगळ्यांना त्राही भगवान करून सोडेल". अठरा विश्वे सासरी गरिबीच भोगणाऱ्या त्या माउलीला हे कसे काय शक्य होणार आहे याचे आकलन होईना. कारण गरीबीतल्या माणसाकडे बहुतांशी याचकाचीच भूमिका येते. अशी व्यक्ती काय धडे देणार दुसऱ्याला..?? पण ही भविष्यवाणी शब्दशः खरी ठरली पुढे . मग मामा नक्की कोणाला बरे पुरून उरला आयुष्यभर ...?? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे - अन्याय करणाऱ्या वर्गाला तो अगदी पुरून उरला ... !! मग तो कंपनीचा मालक वर्ग असो, शाळेतला जाचक मुख्याध्यापक असो, एखादी संस्था असो , गुंड मवाली असो, नोकरीतला बॉस असो कि मिलिटरीतला सार्जंट असो; एव्हढेच काय, पण त्याच्यावर कायमच्या रुसलेल्या नशिबाला सुद्धा तो शेवटपर्यंत पुरून उरला. अगदी सगळ्यांना मामाने खरोखरच त्राही भगवान करून सोडले. याविषयीच्या असंख्य कथांचा उल्लेख त्याच्या आत्मकथनात आहे.
खऱ्याखुऱ्या पीडित आणि शोषित वर्गाबद्दल तो अत्यंत संवेदनशील होता. त्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्याने कायमच दंड थोपटले. कधी कधी स्वतःच्या शक्तीबाहेर जाऊनही. त्याचा अन्याय-विरोध हा सामाजिक संवेदनशीलतेतून आणि भावनेतून निर्माण झालेला होता. त्यातूनच नेतृत्वगुण उपजला आणि तो कामगार नेता झाला. मामा लिहितो :"७१ व्या वर्षी मी अजूनही भावनाप्रधानच राहिलो आहे. ही शक्ती आहे. कमकुवतपणा नाही. भावनाच मला जगवते आहे. पक्षाच्या कार्यात सुद्धा भावना हीच जीवनशक्ती आहे". ज्याने स्वतः तरुण वयातच लेनिन आणि माओ कोळून प्यायले होते, तो म्हणतो "कोरडी मार्क्सवाद -लेनिनवादाची घटपटादि बडबड राजकारणाचा आत्माच हिरावून घेईल. क्रांती हि मुद्दाम करावी लागते . ती होत नाही याची खूणगाठ मी बांधून जगात आलो आहे. हि ज्योत तेवत राहिली त्याचे कारण जनतेचे अनन्वित हाल पाहून माझ्या भावना पेटत; अजूनही पेटतात.". "स्वतःचा बिलकुल विचार न करता सतत दुसऱ्याचा विचार करतो तो कम्युनिस्ट "- हा माओचा विचार दादामामाने त्याच्या आयुष्यात शंभर नव्हे तर दोनशे टक्के प्रत्यक्षात उतरवून दाखवला. भांडवलशाही ही भावनाशून्य माणूस तयार करते असे त्याचे ठाम मत होते. हल्लीच्या काळांत ह्याचे वेगळे उदाहरण द्यायची आवश्यकता खरंच आहे का ..????
राहत्या गावांत पाचवीनंतर शाळा नसल्याने व घराची आर्थिक ओढाताण असल्याने, मामाने रत्नागिरीला जाऊन वेगवेगळ्या घरी आठवड्याचे ७ वार लावून आपले मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण केले. एव्हढ्या संकटांना त्याला अगदी लहान वयात तोंड द्यावे लागले, कि त्याने पुस्तकात चित्रित केलेल्या त्याच्या या कालखंडावर एखादा चित्रपट सहज होईल. शिक्षणाची विलक्षण ओढ असलेल्या दादामामाचा एकमेव प्रेरणास्रोत म्हणजे त्याच्या मातोश्री !! असंख्य हालअपेष्टा सोसून त्याने इंग्रजी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मुंबईत नोकरी मिळणे दुरापास्तच होते. म्हणून तो वायुसेनेत भरती झाला. तिथे त्याने सचोटीने नोकरी तर केलीच, पण मुळातच इंग्लिश मराठी वाचनाची प्रचंड आवड असलेल्या मामाने वायुसेनेतही बरीच पुस्तके वाचली. त्याच्या मनोभूमीत येथेच मार्क्सच्या तत्वज्ञानाचे बीज रोवले गेले. पण ते नेणिवेत होते. अनुभवातून हळूहळू जाणिवेत येत गेले. पण प्रत्यक्ष कार्य अजून सुरु व्हायचे होते. इथे असतानाच कला शाखेतील graduation त्याने पार्ट time पूर्ण केले. यामुळे त्याचं self esteem सुधारण्यास मदत झाली, असं मला वाटतं (ज्याची आवश्यकता होती). वायुसेना सोडल्यावर रायगड जिल्ह्यातील उरण ह्या गावी त्याला शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. मग घरच्या घरी क्लासेस सुरु झाले. माझी आई सांगायची त्यानुसार, मामा BA च्या विद्यार्थ्यांचेही क्लास घेत असे. उरणमध्ये पुरोहित सरांकडे जायचेय म्हणून सांगितले, कि अगदी आत्ता आत्तापर्यंत रिक्षेवाला बरोब्बर इष्ट स्थळी आणून सोडत असे. मामाचा स्वभाव उद्यमशील (enterprising) होता . एखादं दुकान वगैरे पण काढून पाहिलं. Typing institute सुद्धा काढून ती भरभराटीला आणली होती. शाळेमध्ये कमालीची विद्यार्थी प्रियता मिळाली. एखाद्या व्यक्तीला लोकप्रियता मिळाली कि आजूबाजूच्या काही जणांना उगीचच असुरक्षित वाटू लागते. तसेच इथेही झाले. खुद्द मुख्याध्यापकांनाच नाकापेक्षा मोती ( म्हणजे मामा ) जड झाला. शाळेतील आणि स्थानिक राजकारणामुळे ही नोकरी मामाला अखेर सोडावी लागली. क्लास व इन्स्टिटयूट चालूच होते. एके दिवशी शाळेसमोरून एक कामगारांचा मोर्चा गेला. कुतूहल जागे झाले. मोर्चा कसला होता त्याची माहिती मिळविली. पण पुढे काहीच झाले नाही. १९६२ चे भारत चीन युद्ध उद्भवले आणि मामाला पुन्हा Air Force मधून बोलावणे आले. अर्थात मामा सिक्कीम सीमेवर लगेच रुजू झाला. (भारत व चीन युद्धाचे उत्तम पृथक्करण त्याने पुस्तकांत केले आहे).युद्ध फार काळ चालले नाही. देशकर्तव्य पार पाडल्यावर व गरज संपल्यावर उरणात परत आला. पण तिथपर्यंत मामाच्या संपूर्ण अनुपस्थितीमुळे क्लास व इन्स्टिटयूट यांची घडी पूर्णपणे विसकटलेली होती.
वाचनातून आलेली प्रगल्भता आणि तीक्ष्ण सामाजिक जाणीवा, यामुळेच कि काय, पण मामाने चाकोरीबद्ध जीवनशैली कधीच स्वीकारली नाही. ( त्याच्याच भाषेत सांगायचे तर "मध्यमवर्गीय मन बऱ्याच शबल कल्पनांचे कोश आपल्याभोवती विणून आपल्या तथाकथित सभ्यता , संस्कृती , अलिप्तता इत्यादी खास गुणांचे संरक्षण करीत असते".) इतरांचे दुःख बघूनही त्याकडे हृदयहीन तटस्थतेनं काणाडोळा करून स्वतःच्याच कोशात राहणे मामाला पसंत नव्हते. आपल्या देशात दुःख आणि अन्याय यांची काहीच वानवा नाही. समाजातील अन्याय त्याला
खुणावू लागला आणि छोट्या मोठ्या चळवळीत तो ओढला गेला. कॉ. बी. टी. रणदिव्यांची पुस्तिका वाचून तो CPI (M) या पक्षात सामील झाला. पक्षात राहून तो जमेल तसे समाजकार्य करू लागला. आदिवासींमध्येही कार्य सुरु झाले. अगदी तळागाळाच्या पातळीवरून (Grass-root level) !! वेळप्रसंगी उपासमार सोसूनही तो काम करीत असे. एके दिवशी ग्राईंडवेल कंपनीने १२० ट्रेनीजना नोटीस देऊन काढल्याची तक्रार घेऊन एक कार्यकर्ता लगबगीने त्याच्या घरी आला. त्याने मामाला कामगारांची युनियन बांधण्याची विनंती केली. मामाकडे नेतृत्वगुण होताच. इथे फक्त त्याला वाट किंवा चालना मिळाली इतकेच. कार्यकर्त्याच्या विनंतीवर मामाने क्षणभर विचार केला आणि होकार भरला. त्याची पावले कंपनीच्या दिशेने वळली. गेटवर उत्कंठेने नव्या नेत्याची वाट पाहत असणाऱ्या कामगारांनी जयघोषात त्याचे स्वागत केले. ग्राईंडवेल नॉर्टन ट्रेनीज अँड वर्कर्स युनिअन ची स्थापना झाली. इथून पुढे सलग ४० वर्षे तो Grindwell Norton या कंपनीमध्ये कामगार संघटनेचे (अर्थात युनियनचे) नेतृत्व यशस्वीपणे करीत होता. आणखीही काही कंपन्यांमध्ये तो युनियन लीडर होता. लिडरशिप स्वीकारण्याचा निकष एकच ......कामगारांवरील अन्याय !! गेल्या २५ वर्षात कामगार चळवळ खूप बदलली आहे. सर्रास नसेल, पण काही ठिकाणी कामगार चळवळीचे नेतृत्व स्वतःचा खिसा भरण्यासाठी केले जाते . या पार्श्वभूमीवर दादामामाचे स्थान नुसतेच अव्वल नाही, तर ‘अत्युच्च’ ठरते !!
शिस्तप्रिय असल्याने मामाने पक्षाच्या चौकटीचे कधीच उल्लंघन केले नाही. पण केवळ असूया व असुरक्षिततेपोटी कि काय, काही तथाकथित व कोत्या मनोवृत्तीच्या व्यक्तींनी त्याच्या कार्यात ढवळाढवळ करून त्याला प्रचंड अडचणी उत्पन्न केल्या. परिणामी, त्याला नाईलाजाने पक्ष सोडावा लागला. सुमारे २६ वर्षे तो पक्षाचा सभासद होता. पण खरेखुरे कार्य करणाऱ्या खंदया कार्यकर्त्याला काम करण्यासाठी पक्षाची गरज असतेच असे नाही. शेवटी समाजासाठी पक्षकार्य असते; पक्षासाठी समाजकार्य नसते हे तो जाणून होता. सत्तेची अभिलाषा तर कधीच नव्हती. मामाने आपले समाजकार्य चालूच ठेवले. तो फक्त कम्युनिस्ट होता असे मानून त्याच्या कार्याचे मूल्यमापन करणे सपशेल चुकीचे ठरेल. याचे कारण -फक्त पक्षीय आणि सत्तेचे राजकारण करून कम्युनिझमचा किंवा मानवतेचा देखावा करणारे आपल्या देशात काही कमी नाहीत. सगळ्या मानव जातीचे दुःख त्याला खुणावत असे. दु:ख जिथे असेल तिथेच तो जाई. मग तो कामगार असो, शेतकरी असो व आदिवासी असो. सत्तेच्या राजकारणाचे त्याला कधीच आकर्षण वाटले नाही MLA/MP वगैरे अनेक प्रलोभने त्याच्यापर्यंत आली. (त्याच्या पुस्तकात त्याने यासंदर्भात लिहिले आहे ते असे -"मला प्रसिद्धीची बिलकुल हाव नव्हती . ना पैशांची . आमदार / खासदार होऊन काही लोकांचे भले करता येईल असे माझे मत नव्हते. जिथे दिसेल तिथे अन्यायावर संघटित रित्या तुटून पडून अन्यायाला वाचा फोडावी असे मला वाटे").

जीवनातील प्रत्येक क्षण दादामामा समरसतेने जगला व त्यामुळेच तो इतके सुंदर आत्मकथन लिहू शकला. ( एवढेच नव्हे तर लोकाग्रहास्तव त्याने या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर देखील लिहायला सुरुवात केली होती. ८७ प्रकरणे लिहून पूर्ण झाली होती). त्याच्या लिखाणात कमालीचा ओलावा होता, तशीच सृजनशीलता देखील पुरेपूर होती. त्याचे हे पुस्तक जो वाचेल त्याला एव्हढे कळेल कि पुरोहितांनी ठरवले असते तर ते एक मराठीतील मोठे साहित्यिक म्हणून प्रसिद्ध पावले असते. मामा कथा तर उत्तम लिहीत असेच, पण कविताही अप्रतिम करीत असे. त्याचे ज्ञानदालन अमर्याद होते. तात्विक बैठक भलतीच पक्की होती. बुद्धी निश्चयात्मक आणि कमालीची तीक्ष्ण होती. स्मृती १०TB तरी असेल. शेक्सपियर ते मनुस्म्रुति हा वाचनाचा आवाका होता. त्याने पुस्तके वाचून नुसती घरी लायब्ररी केली नाही, तर त्यातील वेगवेगळी तत्वे प्रत्यक्ष अमलात आणून त्याचा समाजासाठी उपयोग केला. त्याला व्यायामाची आवड इतकी होती कि काही वेळा तुरुंगवास घडला तरी तिथे व्यायाम करीत असे. कदाचित व्यायाम केला नाही, तर त्याचे इप्सित कार्य हातून होणार नाही हे त्याला माहित होते. कमालीचे धाडस संवेदनशीलता, वक्तृत्व, क्रियाशीलता, निरीक्षण शक्ती, दुर्दम्य निग्रह, सोशिकपणा, Political acumen, संघनेतृत्व, तत्त्वनिष्ठा, विचारातील स्वच्छता, हजर-जबाबीपणा, मुत्सद्दीपणा, उत्तम इंग्रजी व मराठी भाषा हे त्याचे गुण कामगार चळवळीमध्ये नेहमीच उपयोगास आले. आपल्या कामात हृदय ओतणे आणि रक्ताचा घाम करणे हे त्याच्या आजीच्या घराण्यातून आले आहे, असं त्याचं स्वतःचंच म्हणणं होतं. Shop and establishment act संदर्भातील एका केसमध्ये तर त्याने स्वतःचेच वकीलपत्र घेऊन स्वतःची आणि सहकाऱ्यांची एका फौजदारीतून सुटका केली होती. त्याच्या ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, मुत्सद्दी पण प्रेमळ व्यक्तित्वाला एक भाबडेपणाची 'सुंदर' किनार होती.
माझ्या मावशीचे व आईचे लग्न मामाने कर्ज घेऊन केले होते. कुटुंबाप्रती त्याचे प्रेम आणि कर्तव्य भावना खूप वेगळ्या स्तरावरच्या होत्या. दादामामाच्या जीवनकार्यात आमच्या मामीचा वाटा सिंहिणीचा आहे. किमान ५० वर्षे अगदी दिवसाचे २४ तास मामा समाजकार्यात ध्यानी-मनीं गुंतला असल्याने, आहेत त्या उपलब्धीयांमध्ये संसार सुरळीत चालू ठेवण्याचे मोठेच कार्य मामीने ज्या शौर्याने करून दाखवले त्याला तोड नाही. मामाची भूमिका समजून घेऊन ऐहिक सुखावर तिलांजली देण्याचा त्याग तिने आयुष्यभर केला. आजची कुठली विवाहित स्त्री हे करेल ...?? कामगार वर्गाचा दुवा तिलाही मिळाला असेल यात शंका नाही. तसेच मामाची मुलेही अतिशय समजूतदार निघाली. प्रतिकूल परिस्थितीत राहण्याबद्दल एकही त्राग्याचा शब्द मी त्यांच्या तोंडून आजवर ऐकलेलं नाही. दादामामाविषयी आणखी बरेच काही लिहिता येईल, पण माझा तो प्रांत नाही. दुसऱ्यांची दु:खे स्वतः जवळून अनुभवणारे आणि निवारणारे असे कितीसे नेते आज भारत वर्षात आहेत ?? “जीवन त्यांना कळले हो " असे उद्गार पु. लं नी कै.एस.एम.जोशीं विषयी काढले होते, ते आमच्या दादामामालाही तंतोतंत लागू आहेत.
जिव:श्र्च कंठ:श्र्च कॉम्रेड दादामामाला आजच्या कामगार दिनी माझी भावपूर्ण आदरांजली !! 🙏🌹🌹🌹
वा विकास!छान लिहिलंय! अशी व्यक्तमत्व आपल्या जीवनात भेटणं तेही जवळचे नातेवाईक म्हणुन असणे महद् भाग्याचे!काॅम्रेड ना आदरांजली
ReplyDeleteसरिता, अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! कॉ. पुरोहितांचं कार्य अल्पश्या शब्दांत का होईना पण तुमच्यासारख्या सहृदय मित्रांपर्यंत पोचविण्याचं मला समाधान मिळाले.
DeletePujya Dadamama hyanna kamgar dinachi hridaya pasun Adaranjali. Jivanachi kasoti swa la jhidkarun, jeev lokarpan karun ha atma kasa uttirna zala, hya pasun amha sarvanna khup shikayche ahe.
ReplyDeleteकाका, अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! कॉ. पुरोहितांचं कार्य अल्पश्या शब्दांत का होईना पण तुमच्यासारख्या सहृदय मित्रांपर्यंत पोचविण्याचं मला समाधान मिळाले .
Deleteसुंदर लेख,विकास
Deleteप्रिय विकास,
ReplyDeleteमामांचा चरित्रपट अतिशय सुरेख रितीने उलगडून दाखवल्याबद्दल धन्यवाद...!!
आज कामगार दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन...!!
मामांच्या स्मृतीला माझे अभिवादन!
ReplyDeleteविकास जी, आपण अतिशय मोजक्या शब्दात मामांचे शब्दचित्र उभे केले आहे. मी लवकरच मामांचे आत्मचरित्र मिळवून वाचिन. धन्यवाद!
लेख छान आहे . मन हेलावून गेले त्यांच्या कर्तृत्वाला सलाम.
ReplyDeleteDada Mama na Manapasun Namaskar Aahobhgya ki aamhala he sagle vachayla milale Evhdi talmal aaj chya ghadila khup Durmil aahe Bapu Bless him Forever Ambadnya
ReplyDeleteहरी ओम स्वातीविरा, तुम्ही लेख वाचल्याने आनंद झाला. अंबज्ञ !!
DeleteNehàmipramanech Blog mast zalay! Mamanche kary tar lekh lihinya itake mothe aahech. Ashi manase aata javal javal nahit ase mhanayala harkat nahi kinwa atishay durmil zali aahet. Maminchya sathicha ullekh vishesh aavadala. Aaplya ichha aakanshana murad ghalun jagnarya stryahi aata nahi rahilya.
ReplyDelete