द किचन क्विन...!! साधारण पाचेक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल . दुबईतील आमचे मित्र मिनार - मिताली कोरडे यांनी आम्हां दोघांना मोठ्या अगत्याने घरी जेवायला बोलावलं होतं . हे दांपत्य अत्यंत रसिक आणि सौंदर्यदृष्टी असलेले . दोघंही कुठल्याही महत्वाच्या कार्यक्रमाला जाताना काय ल्या वं , कसा पेहेराव असावा, कुठलं अत्तर लावावं, कसे वागावे, कसे बोलावे याची परिपूर्ण माहिती असलेले. दोघांचेही Etiquette आणि मधुर बोलणे तर par excellence !! मिताली ही अतिशय सुगरण आहे, हे आम्ही फक्त मिनारच्या तोंडून ऐकून होतो. पण त्याची खरोखरची प्रचिती आम्हां दोघांनाही त्या दिवशी आली. माझ्या काही मित्रांना धक्का बसेल पण, सी.के.पी. पद्धतीने परंतु तरीही शंभर टक्के शाकाहारी स्वयंपाक तिने बनवला होता. अतिशय चविष्ट बिरडं आणि सरोबरीनं सुका मेवा घातलेली खीर हे त्यातले highlights होते. हे दोन्ही पदार्थ एव्हढ्या निगुतीने आणि सरंजामी बनवलेले मी खरंच त्यापूर्वी खाल्ले नव्हते. काय काय वंजने घातली होत...
My perspectives on facets of life...