मूर्तिमंत मित्र .....!!
ज्योतिषशास्त्रातील अभ्यासक धर्मत्रिकोणातील राशींच्या स्वामींना तारक-ग्रह मानतात. हा त्रिकोण आणि हे तारक-ग्रह आपल्या आयुष्यावर गहिरा असर करतात. 'मुर्ती' नावाचा इष्ट ग्रह माझ्या पत्रिकेत उचित वेळी उचित ठिकाणी अवतरला. हिंदी सिनेमात पहिल्या दृश्यात दिसलेले एखादे पात्र नंतर एकदम शेवटी येऊन काहीतरी विशेष भूमिका बजावते, तसा मूर्ती १९८६ नंतर एकदम २० वर्षांनी दुबईत भेटला. His reappearance made a big difference in my life...... !!
ज्योतिषशास्त्रातील अभ्यासक धर्मत्रिकोणातील राशींच्या स्वामींना तारक-ग्रह मानतात. हा त्रिकोण आणि हे तारक-ग्रह आपल्या आयुष्यावर गहिरा असर करतात. 'मुर्ती' नावाचा इष्ट ग्रह माझ्या पत्रिकेत उचित वेळी उचित ठिकाणी अवतरला. हिंदी सिनेमात पहिल्या दृश्यात दिसलेले एखादे पात्र नंतर एकदम शेवटी येऊन काहीतरी विशेष भूमिका बजावते, तसा मूर्ती १९८६ नंतर एकदम २० वर्षांनी दुबईत भेटला. His reappearance made a big difference in my life...... !!
![]() |
Shivasagar Estate, Worli |
यानंतर एखाद वेळी आम्ही फोनवर एकमेकांशी बोललो इतकेच. पण त्यापेक्षा जास्त एकमेकांशी interaction झाली नाही. (तेव्हा व्हाट्सअप सारख्या सुविधा नव्हत्या टच मध्ये राहायला. टेलिग्राम सोडल्यास ट्रंक कॉल लावणे हे त्या काळी संपर्क साधायला एकमेव सोप्यात सोपे मान्यताप्राप्त साधन होते). सुरवातीच्या काळात मूर्तीच्या गुणांना मूर्त स्वरूप प्राप्त झालं, ते आम्ही नेहमीच ज्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक गुरु मानलं, त्या माधव सखदेव साहेब यांच्यामुळे !! आम्हां दोघांनाही श्री सखदेव साहेब हे बराच काळ वरिष्ठ आणि मार्गदर्शक म्हणुन लाभले. Both of
us inculcated a strong value system in ourselves and our teams which we had learnt from Respd. Shri Sakhadeo. नंतरच्या काळात मूर्ती आणि माझी जी आगळी वेगळी मैत्री झाली, तिचा पहिला समान धागा इथे आहे. एक दिवस मी बंगलोरला असताना मला एक पंधरा-वीस पानी रिपोर्ट कोरियरनेआला. हा टेक्निकल रिपोर्ट होता Indo gulf fertilizers, जगदीशपूर येथे युरिया अप्प्लिकेशन साठी वापरल्या गेलेल्या Philips 316 KCR ह्या Zero ferrite इलेक्ट्रोड संदर्भात
!! रिपोर्ट बनवला होता मूर्तीने आणि circulate केला होता सखदेवसाहेबांनी. तो वाचल्यावर मूर्ती नॉर्थमध्ये किती छान काम करतोय ह्याचा साक्षात्कार झाला. आणि नकळत त्याच्यासाठी एक मनात जागा तयार झाली. साधारण ८८ मध्ये असेल, पण मूर्तीच्या मातोश्री अचानक निधन पावल्या. तेव्हा त्याच्या बसवनगुडीतील घरी मी भेटायला गेलोतो. तो खूप हळवा झाला होता.(नव्हे होताच तो हळवा !). नन्तर तो दिल्लीहून बंगलोरला यायचा, तेव्हा क्वचित भेट घडायची. तत्कालीन मुख्यमंत्री कै रामकृष्ण हेगडे यांचा निवडणुकीतील बालेकिल्ला असणाऱ्या 'बसवनगुडी'विषयी त्याला अतोनात प्रेम होते. दुतर्फा रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या आणि जणू काही जाण्यायेणाऱ्या वाहनांवर चवऱ्या ढाळणाऱ्या असंख्य वृक्षांमुळे बसवनगुडीतला हा महत्वाचा रस्ता मांडव घातल्यासारखा दिसे, ज्याचा मूर्तीला खूपच अभिमान होता. त्याचे वडील म्हणजे टिपिकल कन्नड व्यक्तिमत्व होते. शर्ट पॅन्ट घालून असत, पण कपाळाला मात्र चंदनाचे U आकाराचे मोठे त्रिपुन्द्र लावलेले असे. ते निवृत्तीपर्यंत बंगलोर डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये वरिष्ठ पदावर होते आणि असे असून 'सचोटी' हा त्यांचा मोठ्ठा गुण होता असं मूर्ती मला बरेच वेळा सांगे. डिसेम्बर १९८८ साली रसायनशास्त्रातील आयोनिक इक्वेशनमध्ये इलेक्ट्रॉन्स ट्रान्स्फर होतात, त्या धर्तीवर आमच्या बदल्या झाल्या. मला मूर्तीने दिल्लीहून येऊन बंगलोरमध्ये रिप्लेस केले आणि मी 'स्वगृही' म्हणजे मुंबईत आलो आणि दोघांचेही घोडे गंगेत न्हाले......!!
त्यानंतर आमचे मार्ग बऱ्यापैकी बदलले. पण कामाचे क्षेत्र तेच राहिले ...ते म्हणजे वेल्डिंग टेक्नॉलॉजि आणि मार्केटिंग !! ह्या क्षेत्रात जगभरात एक नंबरवर असणाऱ्या LINCOLN कंपनीचे प्रॉडक्ट भारतात मी विकत असे, तेच प्रॉडक्ट मूर्ती आखाती देशात विकत असे. २००४ पर्यंत हे चालले. Manager- Technical Services ह्यापलीकडे माझी मजल इथल्या कंपनीत जाणार नाही असे लक्षात आल्यावर, मी बाहेरील देशांमध्ये
नोकरी शोधात होतो. अचानक देवकृपेने मूर्तीच्या
संपर्कात आलो. आमच्यातील बॉण्ड तसाच होता. पण मूर्तीचे स्पिरिट खूप म्हणजे खूपच competitive होते. तब्बल ९ वर्षे नोकरी केल्यावर 'विकास' Lincoln fraternity च्या बाहेर जाणार हि कल्पना त्याला भयावह वाटली. म्हणून त्याने एक वेगळीच फ्रॅटर-नीती अर्थात शक्कल शोधून काढली. ESAB ह्या दुसऱ्या वेल्डिंग कंपनीमध्ये माझा अजून एक मित्र दुबईत होता. मूर्तीने मला भीती घातली कि तू त्याला दुबईत जॉबसाठी CV पाठवलास. तर तो तुझ्या भारतातील बॉसला फोन करून सांगेल. अगदी त्याच्या भाषेतच लिहायचे तर " This guy will screw your happiness. So never ever do it . Just leave it to me ...!!" पण दिल्या शब्दाला तो जागला हेही खरे. जे काही लागेल ते सर्व त्याने माझ्यासाठी करून मला उत्तम नोकरी मिळवून दिली. हा सर्व बाजूने खरोखरच केवळ ड्रीम जॉब होता. बहूआयामी आणि मल्टिस्किल माणसासाठी हा स्लॉट होता. मला त्यात पूर्ण बसण्यासाठी पहिले १ वर्ष लागले. Technical skills, Selling Skills, advertisement, recruitment, man management, personnel management, public speaking, event management, logistics, material management, Communication with expats अशी अनेक कौशल्ये यशस्वी होण्यासाठी अत्यावश्यक होती. नंतर मी २०१४ पर्यंत ही नोकरी passionately केली. माझ्या कंपनीने माझ्या मेहेनतीने पुरेपूर फळ मला दिले.
ह्या ९ वर्षात मला मूर्तीचे अनेकविध पैलू अनुभवता आले. ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये एक Phenol नावाचे रसायन असते. मूर्ती तसा होता.....Pungently Sweet !! माझ्यासारख्या जवळच्या मित्रांना त्याचा स्वभाव गोड वाटला, तर काहींना pungent म्हणजे काय ते त्याने दाखवून दिले. दुबईमध्ये सुरवातीच्या काळात त्याच्या विनोदबुद्धीने माझ्या आजूबाजूचे वातावरण खूप हलके केले. आमच्या हेड ऑफिसमध्ये एक जेरी पटवारन नावाचा फिलिपिनो स्टेनो होता. मूर्तीने त्याची ओळख माझ्याशी करून देताना " हि इज जेरी पटवर्धन " अशी करून दिली आणि मिश्कीलपणे हसून विनायकराव पटवर्धन कसे ग्रेट गायक होते हे मला सांगितले. Jerry was clueless for a moment ! 😆मला एव्हढेच कळले कि मूर्तीला संगीतामधील बऱ्यापैकी माहिती दिसतेय. त्याला कर्नाटक संगीताची खूप गोडी होती. साऊथ मधले मदुराई मणीअय्यर ,सिमानगुडी श्रीनिवास अय्यर, पालघट मणी ऐय्यर, तिरुमकुडालू चौडय्या, एम एल वसंतकुमारी, अशी नावे तो वॉल्टर हॅमंड , क्लाईड वॉलकॉट , इव्हर्टन वीक्स या धर्तीवर एका श्वासात घ्यायचा. दक्षिणेतल्या रसिकांना एम. एस. म्हणजे तर 'हाऊसहोल्ड'च वाटते. चौडय्या स्वामी कसे ग्रेट व्हायोलिन वादक होते
आणि त्यांच्या स्मृतिपुत्यर्थ बांधलेले बंगलोरातील चौडय्या हॉल कसा व्हायोलिनच्या आकाराचा आहे ( तसेच त्यांच्या व्हायोलिनला कशा ७ तारा होत्या), हे तो मला सांगे. घरी बसलो असू तर, मग ह्याच हॉल मधल्या एखाद्या अय्यर किंवा सीतारामैय्याची एक विडिओ कॅसेट लावायचा. थोडा वेळ आम्ही एखादा 'पंतुवराळी' नाहीतर 'वातापी' ऐकायचो ! त्याला कलाकाराच्या कलेची तर माहिती होतीच, पण कलाकाराच्या अगदी खासगीतल्या खासगी गोष्टींची पण त्याला माहिती असे (पुलंच्या नारायणासारखी !! ). एक कोणसासा दाक्षिणात्य कलाकार ८३ व्या वर्षी नेहमी व्हीलचेअरवर असतो, पण त्याच्या वाईट सवयी अजूनही गेलेल्या नाहीत, असा मजकूर तो मला सांगत असे. कुठल्याश्या मुख्यमंत्र्यांचे कोणाशी अफेयर आहे इथपासून, इथपासून ते येशुदास हा गायक शबरीमलायच्या टीक्षीला जाऊन नॉनस्टॉप कसे तासंतास गातो ह्याची माहिती तो देई, ह्या सगळ्या विद्वान गायक वादकांचे १९६० च्या आधीचे लाईव्ह व्हिडिओ शूटिंग त्याच्याकडे index सकट उपलब्ध होते. पण त्याने मला कृपा करून हे कोणाला सांगू नकोस असेही बजावले होते. हिंदुस्थानी संगीतातील त्याचे आवडते गायक हे भीमसेन जसराज ह्यापैकी कोणी नसून पंडित गोकुलोत्सव महाराज हे होत. कधीतरी लहर लागली कि त्यांचे संपूर्ण नांव तो उगीचच बसल्या बसल्या उच्चारित असे ... पद्मभूषण पंडित डॉक्टर आचार्य गोस्वामी गोकुलोत्सव महाराज आणि मग मिश्कीलपणे हसून मला विचारे “ Eh Vikas, you like him..??” ( मूर्तीला कुणाचेही संपूर्ण नांव उच्चारायची (अथवा पुनरूच्चारायची ) विशेष आवड होती. त्यासाठी उत्तम स्मरणशक्ती लागते, तीही त्याच्याजवळ होती )
आणि त्यांच्या स्मृतिपुत्यर्थ बांधलेले बंगलोरातील चौडय्या हॉल कसा व्हायोलिनच्या आकाराचा आहे ( तसेच त्यांच्या व्हायोलिनला कशा ७ तारा होत्या), हे तो मला सांगे. घरी बसलो असू तर, मग ह्याच हॉल मधल्या एखाद्या अय्यर किंवा सीतारामैय्याची एक विडिओ कॅसेट लावायचा. थोडा वेळ आम्ही एखादा 'पंतुवराळी' नाहीतर 'वातापी' ऐकायचो ! त्याला कलाकाराच्या कलेची तर माहिती होतीच, पण कलाकाराच्या अगदी खासगीतल्या खासगी गोष्टींची पण त्याला माहिती असे (पुलंच्या नारायणासारखी !! ). एक कोणसासा दाक्षिणात्य कलाकार ८३ व्या वर्षी नेहमी व्हीलचेअरवर असतो, पण त्याच्या वाईट सवयी अजूनही गेलेल्या नाहीत, असा मजकूर तो मला सांगत असे. कुठल्याश्या मुख्यमंत्र्यांचे कोणाशी अफेयर आहे इथपासून, इथपासून ते येशुदास हा गायक शबरीमलायच्या टीक्षीला जाऊन नॉनस्टॉप कसे तासंतास गातो ह्याची माहिती तो देई, ह्या सगळ्या विद्वान गायक वादकांचे १९६० च्या आधीचे लाईव्ह व्हिडिओ शूटिंग त्याच्याकडे index सकट उपलब्ध होते. पण त्याने मला कृपा करून हे कोणाला सांगू नकोस असेही बजावले होते. हिंदुस्थानी संगीतातील त्याचे आवडते गायक हे भीमसेन जसराज ह्यापैकी कोणी नसून पंडित गोकुलोत्सव महाराज हे होत. कधीतरी लहर लागली कि त्यांचे संपूर्ण नांव तो उगीचच बसल्या बसल्या उच्चारित असे ... पद्मभूषण पंडित डॉक्टर आचार्य गोस्वामी गोकुलोत्सव महाराज आणि मग मिश्कीलपणे हसून मला विचारे “ Eh Vikas, you like him..??” ( मूर्तीला कुणाचेही संपूर्ण नांव उच्चारायची (अथवा पुनरूच्चारायची ) विशेष आवड होती. त्यासाठी उत्तम स्मरणशक्ती लागते, तीही त्याच्याजवळ होती )
आमच्याकडे डॉन लीडल नावाचा अठ्ठावन्न वर्षाचा एक सिनिअर इंजिनिअर होता. त्याला अनाकलनीय अनपेक्षितपणे गोष्टी करण्याची सवय होती ( विशेष करून त्यातून पुढे समस्या उद्भवायच्या !! ). त्याचे दुबईच्या एका चर्चमध्ये 'नांव ' होते. खरे खोटे कुणास ठाऊक. रेव्हरंड हे बिरुदही त्याला मिळाले होते . ( त्याच्या स्वतःमध्ये 'रेव्हरन्स' किती होता ते तपासावे लागेल 😛). मूर्तीच्या उपहासात्मक विनोदाचे हे एक मोठठेच गिर्हाईक होते. मूर्तीच्या मते हा गृहस्थ ऑफिसच्या कामापेक्षा चर्चचेच काम अधिक करीत असे. बरोब्बर एक नोव्हेंबरला मूर्ती मुद्दाम मला विचारी" Are they coming tomorrow to office?? " कारण २ नोव्हेंबरला 'All Souls Day' असल्याने डॉन नक्की ऑफिसला येणार नाही हे त्याला माहित असे. त्याच्याकडे एका शारजामधील Cemetery च्या चाव्या होत्या. तिथे वर्षातून एकदा जाऊन तो सगळ्या थडग्यांना रंगसफेदी करीत असे आणि मग एक वर्षासाठी गेट बंद करीत असे. ही ख्रिस्ती धर्मासाठी सर्व्हिस होती. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मूर्ती त्याची जाम फिरकी घेत असे. जाबेल अली औद्योगिक वसाहतीजवळ एक मोठा डिश अँटेना होता . तिथून गाडीने जाताना मूर्ती डॉनला विचारी " Don, is it true that all the souls gather here on this antena..??" डॉन काय काय अनाकलनीय गोष्टी करीतसे, ह्याचा अजून एक किस्सा. !! एकदा आमच्या ऑफिसला एका मोठ्या पाईप मिल कंपनीचे CEO मला अचानक भेटायला आले. नेमका मी आमच्या डायरेक्टर लोकांबरोबर महत्वाच्या मिटिंग मध्ये होतो. त्यामुळे मी त्यांना ५ मिनिटे भेटून, डॉनला बाजूला बोलावून सांगितलं कि त्यांना एखाद्या चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला घेऊन जा. You won't believe, पण डॉन त्यांना जवळच्याच एका सामान्य उडप्याकडे जेवायला घेऊन गेला. I was awfully speechless !! नंतर मूर्ती काही दिवस हा किस्सा मला ऐकवून माझी मजा घेत असे. एकदा कशावरून तरी डॉनचे आणि मूर्तीचे कशावरून तरी भांडण झाले. तेव्हा चिडून मूर्ती त्याला म्हणाला कि "Don, you are just 58 years old baby and nothing more than that!!". त्याला देण्यासाठी एकदा मूर्तीने माझ्या हातात एक airmail चा लिफाफा ठेवला. मायन्यावर लिहिले होते " ख्रिस्ती धर्मगुरू पादारविंदे डॉन एडविन मेल्वीन सॅबस्टिअन लीडल ए -स्क्वेअर" प्रति !! माझी हसून हसून मुरकुंडी वळली.
Late Srinivasa Murthy (मूर्ती) |
मूर्तीकडे एक पूर्ण स्टोरीबुक होईल इतके किस्से होते. त्यातले काही तो मला सांगत असे. किंबहुना त्याच्या स्टोर्या आणि माझ्याकडील कॉर्पोरेट कथा असे मिळून खरंच एक पुस्तक काढू असेही आम्ही त्या वेळी ठरवले होते. त्या पुस्तकाचे नाव योजले होते "सुरस, रम्य आणि चमत्कारिक कथा " ( शॉर्ट फॉर्म -SRC stories ). काही विलक्षण प्रसंग ऑफिसात घडला कि मूर्ती म्हणे " ये आराम से तुम्हारे SRC में जायेगा I " आणि हसायचा.
मी दुबईला जाण्यापूर्वी ऑफीसमध्ये एक इजिप्शिअन Co-ordinator होती. मूर्तीला आकर्षित करण्यासाठी तिने वेगवेगळ्या वशीकरण तंत्रांचा अवलंब कसा केला, हे तो मला बरेच वेळा रंगवून सांगे. " I was a man with a strong character and hence, nothing happened to me" असे अभिमानाने सांगून तो ही कथा संपवे. मूर्तीने डिटेक्टिव्ह म्हणून नक्की नांव काढले असते. तो बंगलोरमध्ये असताना त्याला एक सुब्रमण्यम नावाचा बॉस होता, जो खूप भ्रष्टाचारी होता. तो सगळ्या डीलर्सकडून पैसे खाऊन त्यांना जास्त डिस्काउंट देत असे. हे सगळं खूप विकोपाला गेलं होतं. आणि ही त्याची सगळी लफडी - कुलंगडी एकदा मूर्तीने सगळ्यांच्या समोर मोठ्या युक्तीने.बाहेर काढली. एकदा कंपनीने डिस्ट्रिब्युटर मिटिंग झाल्यावर कॉकटेल पार्टी ठेवली होती. काही थोडे अपवाद सोडल्यास ड्रिंक्सवर सगळ्यांचेच प्रेम होते (विशेष करून ड्रिंक्स फुकट असल्याने). याचा फायदा मूर्तीने उठवला. त्याने सगळ्या डिस्ट्रिब्युटर्सना भरपूर दारू पाजली. आणि मग बोलता बोलता एक डायलॉग हवेत सोडून दिला " अपने सुब्रमण्यमसाब जैसा आनेस्ट मॅनेजर कहां भी नही मिलेगा "असे म्हणून तो साहेबांची मुद्दाम खोटी तारीफ करू लागला. सगळ्या aggrieved डीलर्सना हे त्याचे सगळे बोलणे असह्य झाले. चार पाच पेग पोटात गेल्यामुळे त्यांचा बांध फुटला आणि एकेक जण खरं काय ते पार्टीत सांगू लागला. एकाने तर वेगवेगळ्या वेळी सुब्रमण्यमसाहेबांनी घेतलेल्या पैशांचा डिटेल हिशेब दिला. एकदा भीड चेपल्यावर सगळेच साहेबांवर तुटून पडले. मूर्ती गालातल्या गालात हसत बाजूला उभे राहून सगळे ऐकत होता. त्याचे काम झाले होते. सरतेशेवटी, सुब्रमण्यमसाहेबांनी उलटी होत असल्याचे निमित्त काढून पार्टीतून पळ काढला. पण मग ऑफिसमध्ये ह्या प्रकरणाची छाननी झाली आणि सुब्रमण्यंसाहेबांची कंपनीतून उचलबांगडी झाली. क्रेडिट कार्डावर बँकांची लूट करून कर्जबाजारी झालेल्या एका इंजिनिअरचाही त्याने गाडीच्या मागच्या सीट वर ठेवलेल्या सॉर्बिट्रेटच्या गोळ्यांवरून पर्दाफाश केला होता. असे गंमतशीर किस्से सांगताना मूर्ती एक टाळी वाजवून पिंचू कपूर सारखे पूर्ण शरीर हलवून हसे.

मूर्तीच्या पद्धतशीर कामाबद्दलचा थोडा उल्लेख वर आलाच आहे. Excel आणि त्यातले फॉर्मुले यावर त्याचे प्रभुत्व होते, ज्याचा वस्तूची किंमत ठरविण्यासाठी आणि बिझनेस अनालिसिससाठी खूप उपयोग होई. ( मूर्तीने इंजिनिअर झाल्यावर एक टायपिंगचा स्वतंत्र कोर्स केला होता. क्लेरिकल भाषेत सांगायचं, तर तो लॅपटॉपवर ८० च्या स्पीडने टाईप करे. एव्हढ्या स्पीडने त्याला टाईप करताना बघून मला सारखी भीती वाटे कि Remington टाईपरायटर सारखे ह्याने डावीकडून उजवीकडे कॅरेज सरकवले, तर लॅपटॉप टेबलवरून खाली पडेल 😆). Jokes apart, आयात निर्यातीचे सगळे नियम आणि त्या संदर्भातील वेगवेगळी शुल्के ड्युटीज ह्याविषयी त्याला उत्तम माहिती होती. त्यामुळे कामात सहसा कधी गडबड होत नसे. तसेच UAE मध्ये बरीच वर्षे काम केल्याने कस्टमर लोकांशी चांगल्या ओळखी होत्या. त्यांच्याशी बोलताना तो कमालीच्या अदबीने बोले. किंबहुना कस्टमर लोकांना मूर्ती कमालीचे झुकते माप देई . आणि तो जर गोरा माणूस असेल, तर बघायलाच नको. ( खूपच वरिष्ठ गोरा अधिकारी असेल, तर त्याची माहिती देताना तो दुसऱ्याच्या मनात एक प्रकारचा आदर निर्माण करताना तो नुसती भीती नव्हे तर भयगंड पैदा करी). ही वृत्ती सहसा बऱ्याच सुशिक्षित दाक्षिणात्य मंडळींमध्ये दिसते. ब्रिटिश अमदानीचा असर अजूनही त्यांच्या रोमारोमात जाणवतो. कुठेही negotiation साठी जाताना त्याचा पवित्रा अति-बचावात्मक असे. बरोबर त्याचा बॉस असला तर आणखीनच !! हा थोडासा स्वभावाचा भाग असू शकेल. पण Lincoln कंपनीची HQ अमेरिकेत असल्याने तो USA च्या कायद्याला खूप घाबरत असावा, असं माझी intuition मला सांगते. इन केलेला Lincoln लोगो असलेला टि-शर्ट आणि टेरिवूलची पॅन्ट असा पोशाख असे. वेळ पडल्यावर मूर्तीने अतिशय सुबक पण आधुनिक असे ऑफिस कंपनीसाठी बांधून घेतले. त्यात एक छोटेखानी ऑडिटोरियम, ओव्हरहेड प्रोजेक्टर, टच स्क्रिनचा मोठ्ठा व्हाईट बोर्ड आणि वेल्डिंग लॅब अशा सगळ्या अद्ययावत सुविधा होत्या. तो ह्या ऑफिसचा custodianच होता !! कंपनीतील लोक त्याला ह्या ऑफिसचा sophisticated 'नारायण ' मानीत. लाल मार्कर पासून ते वेल्डिंग मशीनच्या स्पेअर पार्टपर्यंत सगळ्या बारीक सारीक गोष्टींपर्यंत मूर्तीला उत्तम माहिती होती. गोऱ्या लोकांमध्ये वावरणे मूर्तीला एकदम पसंद होते. कोणी ना कोणी गोरा ह्या ऑफिसमध्ये पडीक असेच. मूर्ती अति-चिकित्सक होता. ऑफिसमधील एका पदासाठी साडे तीनशे अर्ज आले होते. ते सगळे त्याने चेक केले आणि फिल्टर लावून त्यांची संख्या पन्नासवर आणली. इंटरव्यू वगैरे केल्यावर मूर्ती आणि त्याच्या अमेरिकन लेबनीज बॉसने जे काही सिलेक्शन केलं, ते पाहून मी उडालोच. मराठीत उगीच 'म्हण' नाहीये कि- अति विकड, त्याच्या भातात पाकड !!
स्टेटस सिम्बॉल, डेसिग्नेशन, त्या त्या ग्रेडला मिळणाऱ्या facilities ह्याविषयी मूर्तीला खूप आकर्षण होते. ह्या गोष्टींमध्ये थोडेफार वाहून जाण्याची त्याची प्रवृत्ती होती. ब्लॅकबेरी आला तेव्हा पहिला मूर्तीने घेतला. तेव्हा असलेल्या स्कीममुळे म्हणा, पण मला वाटतं बायको मुलीलाही दिला. त्या काळात Bluetooth उर्फ तिसरा कान फुटलेला आमच्या बघण्यातला पहिला माणूसही मूर्तीच !! कंपनीचे सर्व काम Lotus notes वर चाले ह्याचा त्याला मोठाच अभिमान वाटे. कुठलीशी सिस्टिम install करण्यासाठी त्याचा लॅपटॉप १५ दिवस अमेरिकेला पाठवलाय ही गोष्ट तो भूषणावह मानी. दुबईमध्ये उन्हाळा म्हणजे 'मी' म्हणतो !! एकदा पार्क केलेल्या आमच्या गाडीत मी ५३ डिग्री तापमान पाहिलंय. उन्हाळ्याचा त्रास होऊ नये, म्हणून एक कुठलेसे शीतपेय तो खास अमेरिकेहून (क्रेट्समध्ये) मागवी. ती बाटली त्याच्या लॅपटॉप बॅगमध्ये डकविलेली असे. अगदी कस्टमरकडे असला तरी मूर्ती ते पेय साधारण आजूबाजूला बसलेल्या लोकांना कळेल अशा बेताने मुद्दाम उभ्याने प्यायचा, ते पाहून खूप मौज वाटायची. किंबहुना हा काही जणांच्या चेष्टेचाही विषय झाला होता. नंतर भारतात त्याला मोठ्या पदाचे आमिष दाखवून बोलावले गेले. तेव्हाही तो फोन वर मला इनोव्हा गाडी ड्राइव्हरसहित कशी दिले, मी जिथे जाईन तिथे मौर्यामध्ये कसा राहतो वगैरे सांगत असे. असतो एकेकाचा स्वभाव !! मला एकच वाटतं कि त्याला ह्या आवडणाऱ्या ह्या गोष्टी मिळाल्या ना, ते एका अर्थी छानच झालं. जो जे वांछील, तो ते लाहो !! पण मग आयुष्यात काही हक्काच्या गोष्टी त्याला मिळाल्या नाहीत त्याही मला माहितेत, त्यासाठी काय उक्ती लावावी हे मात्र कळत नाही...... ( तो विषय सोडूनच दिलेला बरा !!)
मूर्तीला 'कायदा' ह्या विषयात विशेष रस होता आणि हे त्याने मला सांगितले होते. त्याने LLBसाठी कुठल्या तरी युनिव्हर्सिटीच्या टर्म्स सुद्धा भरल्या होत्या. पण नंतर काय झाले कोणास ठाऊक. त्याच्या कामात आणि drafting मध्ये एक legal flavor जाणवे. आपण कायद्यात कुठेही अडकू नये अशी त्याची धडपड असे. तसेच स्व-हक्काविषयी तो विशेष जागरूक असे. जेबेल अली इंडस्ट्रिअल मध्ये त्यांचे ऑफिस होते, त्यामुळे त्याच्या गाडीवर अथॉरिटीने मुद्दाम एक स्टिकर लावला होता, जेणेकरून गेटमध्ये त्याला थांबण्याची गरज पडू नये. एकदा गेटवर बहुधा नवखा सेंक्यूरिटी गार्ड असावा. त्याने मूर्तीला उगीचच पण कर्तव्य म्हणून हटकले. त्यावर मूर्तीने गाडीतूनच त्याला स्टिकर दाखवून भरपूर arguments केली. (कन्नड लोक भांडण करताना आणि प्रश्न विचारताना हाताची मूठ वळून बॉक्सरसारखी पुढे मागे हलवतात. ही क्रिया त्याने पंचवीसेक वेळा केली ). गार्ड अरेबिक असल्याने त्याचा २ amp चा फ्युज उडाला. त्याने मूर्तीला आत येऊन कॅप्टनला भेटावे म्हणून फर्मावले. मूर्तीने आत जाऊन पुन्हा भांडण केले. सरते शेवटी मूर्तीला वाईट पद्धतीने समज देण्यात आली. अरेबिक राष्ट्रात बरेच वेळा त्यांच्या कलानेच घ्यावे लागते. मूर्तीला अन्याय खपत नसे. बँका, इन्शुरन्सवाले, इलेक्ट्रिसिटी बोर्ड , टेलीफोनवाले, वॉशिंग मशीनसारख्या वस्तू पुरवणाऱ्या कंझ्युमरवाल्या कंपन्या अशांपैकी कोणाकडूनही काहीही चूक झाली, कि तो डायरेक्ट चेअरमनला पत्र लिहायची धमकी देत असे. (मूर्तीचे drafting चांगले होते !!). तो परफेक्शनिस्ट देखील होता. एकदा आमच्या कंपनीत स्टोअरमधल्या एका वर्करने एका भारतीय महिलेची छेड काढली. त्याचा राग मूर्तीने डोक्यात ठेवला होता . नंतर लगेच कंपनीच्या गेट-टुगेदर function मध्ये मूर्तीने मुद्दाम लाईट घालवून अंधारात त्या वर्करच्या न कळत असा काही धपाटा घातला, की तो वर्कर नंतर सगळ्यांना विचारीत फिरत होता कि कुणी दणका घातला पाठीत म्हणून. 😆
कामत रेस्टॉरंट |
मूर्तीला Raffles चे फार वेड होते ( एक प्रकारची लॉटरी !! ). कुठल्याही मॉलमध्ये गेल्यावर तो आठवणीने rafflesची कुपन्स न चुकता भरून तिथल्या मोठ्या बॉक्स मध्ये टाकत असे. गम्मत अशी कि त्याच्या घरातील टीव्ही, मायक्रो, म्युझिक सिस्टीम, व्हिडिओ प्लेयर, इस्री वगैरे बऱ्याच गोष्टी Raffles वर त्याला मिळाल्या होत्या असे त्याने मला एकदा सांगितले. तेव्हा मी त्याला गमतीने विचारले Murthy, what about your wife and daughter ?? 😆 ह्या निमित्ताने मूर्तीच्या काही लकबी आणि सवयी मला आठवतात. मूर्तीचे ड्रायविंग अतिशय सुंदर आणि सुरक्षित होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्याच्या Camry गाडी वर 3 वर्षात एकही scratch नव्हता . एक तर तो रोज सकाळी पुढून पाठून नीट गाडीचे निरीक्षण करीत असे. दुबईमध्ये स्पीड लिमिटचे इतरांना लागणारे दंड त्याला कधीही लागले नाहीत. आणि त्याचा त्याला विशेष अभिमान होता.
मूर्तीला इतरांवर विनोद करायची सवय होती. ( Cutting the jokes at the expense of others !! ). पण त्याच्यावर केलेला एखादा विनोद मात्र त्याला झेपत नसे. The people whom he didn't like, he used to outrightly dispel them by using some special adjectives like crazy, lunatic, nut, AH etc. टीममधील कुणाचीही स्तुती मुर्ती सहसा करीत नसे. 'No criticism' was the best compliment anyone would get !! ऑफिसच्या पत्र व्यवहारात Please do it लिहिण्यापेक्षा Kindly do it असे लिहावे असं त्याचं मत होतं. प्लिज ह्या शब्दात विनंती असली, तरी ऑर्डर करण्याचा अविर्भाव आहे असे तो मानी. एखादी गोष्ट पटली नाही, कि इतर दाक्षिणात्य लोकांसारखे हा देखील " व्हाई व्हाई ??" असे विचारी. तसेच काही इंग्रजी शब्दांचे त्याचे उच्चार संस्कृतोद्भव होते . उदा. Withstand हा शब्द तो विदस्टॅन्ड असा उच्चारी. काम संपले हे सांगण्यासाठी YES finished असे म्हणून आपण खिरापत किंवा मसाला सुपारी खाल्यावर हात झाडतो, तसे झाडण्याची त्याची पद्धत होती. त्याला राग आला कि डाव्या दाढा एकमेकांवर घासून थोडीशी मान हलवून तो राग व्यक्त करीत असे. त्याला काही disturbing news दिली ( ऑर्डर गेली वगैरे) , कि तो इतका अपसेट होई कि समोरून कुठेतरी उठून जाई, मग ५ मिनिटांनी पुन्हा येऊन समोर बसे. कुठल्याही आणीबाणीच्या काळात मूर्तीला पॅनिक व्हायची किंवा अति सतर्क व्हायची सवय होती. ८७ साली लखनौला हॉटेलच्या रुमवर अतिरेकींच्या शोधात आलेल्या पोलिसांना पाहिल्यावर मूर्ती इतका पॅनिक झाला होता, कि पुढले दोन दिवस कुठलीही गोष्ट तो नीट करू शकला नव्हता. काही लोक जसे जेवताना उदरं भरणं हा स्वच्छ हेतू ठेवून जेवतात, तसेच दुबईत नोकरीसाठी गेलेले लोक saving च्या आकड्याशी बांधलेले असतात. माझ्या आधी बरीच वर्षे UAE मध्ये आलेला मूर्तीही ह्याला अपवाद नव्हता. कधीतरी मूडमध्ये आला कि त्याचे आत्तापर्यंत किती सेविंग झालयं, ते तो मला हातवारे करून सांगे. उदा. तर्जनी उंचावून मग त्याला आडव्या हाताने छेद देई वगैरे ( तोंडाने आकडा नाही सांगणार 😀). कुठल्या गोष्टी गुपित ठेवायच्या याची मूर्तीची एक स्वतःची आचारसंहिता होती. काही सांगायचं नसलं, कि तो आपण लहान मुलांना तोंडावर बोट ठेवून शु sssssss असे म्हणतो, तशी खूण तो करायचा. पण त्याला political acumen चांगले होते.
मूर्ती अतिशय सुसंस्कारित होता. माझ्या पत्नीला घेऊन एकदा मूर्तीने घरी बोलावले होते. ( मुलीच्या भारतातील
शिक्षणामुळे बरेचदा तो दुबईला एकटाच असे). गप्पा आणि चहा झाल्यावर त्याने माझ्या पत्नीला "देवाजवळचे कुंकू लावून घ्या" असं सांगितलं. आणि एक सफरचंद दिले. एकदा विभव लहान असताना दुबईला एकटा आला होता. तेव्हा त्याला मुद्दाम Global Village ला घेऊन गेला आणि छानसा T शर्टही भेट म्हणून दिला. एकदा त्याची पत्नी आणि मुलगी घरी आली असताना मला त्याच्या घरी जायचा योग आला. मूर्तीने उत्तम आदरातिथ्य केले. गप्पा चालू होत्या. मूर्तीने अचानक एक प्लास्टिकचा छोटासा पारदर्शक लवचिक चंबू माझ्या समोर आणून तो दाबून दाखवला. त्यात एक राक्षस होता आणि दाबल्यावर त्याची रक्ताळलेली जीभ लोम्बकळु लागली. त्याची मुलगी सावंती हसून मला म्हणाली "Daddy likes such WEIRD things..!!"
ही सावंती खूप हुशार निघाली. तिने इंडस्ट्रिअल इंजिनीरिंग मध्ये पदवी घेऊन कंपनीत जॉब केला. तिला अमेरिकेत चांगल्या विद्यापीठात मास्टर्स करण्यासाठी प्रवेश मिळाला. ही बातमी सांगायला मला मूर्तीने सिंगापूरमधून फोन केला आणि व्हाट्सअप वर मेसेजसुद्धा आला. मी त्याचे अभिनंदनही केले. पण काय सांगू..?? हा मूर्तीचा आणि माझा झालेला शेवटचा संवाद !! कारण पुढल्या आठच दिवसांनी मूर्तीला सिंगापूरमध्येच एका मॉलच्या एस्केलेटरवर चक्कर आली आणि तो भेलकांडत खाली येऊन कोसळला तो डोक्यावरच !! अपघात मोठा होता. हॉस्पिटलमध्ये मेंदूवर एक दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्याची पत्नी आणि मुलगी तातडीने सिंगापूरला रवाना झाल्या. मूर्ती कोमात गेला आणि नंतर त्याचा दोन चार दिवसातच मृत्यू झाला. योग असा, कि त्याच्या नातलगांनी सगळं तिथल्या तिथेच सिंगापूरमध्येच उरकल्याने मला त्याचे साधे अंत्यदर्शनही झाले नाही.
आपले आयुष्य हे एक प्रकारच्या विणलेल्या वस्त्रासारखं असतं. मूर्तीच्या अकाली जाण्याने ह्या वस्त्रातील बरीच वीण उसवली गेली. आता कधी काही विचार जर मूर्तीशी शेअर करण्यासारखे मनात आले, तर मी त्यांना अक्षरशः गाडून टाकतो. माझ्या ह्या मनस्वी मित्राला ही माझी भावपूर्ण सुमनांजली !! 🙏🌺🌺
********************************************************************************
मूर्ती अतिशय सुसंस्कारित होता. माझ्या पत्नीला घेऊन एकदा मूर्तीने घरी बोलावले होते. ( मुलीच्या भारतातील
मूर्तीसोबत लंच !! |
ही सावंती खूप हुशार निघाली. तिने इंडस्ट्रिअल इंजिनीरिंग मध्ये पदवी घेऊन कंपनीत जॉब केला. तिला अमेरिकेत चांगल्या विद्यापीठात मास्टर्स करण्यासाठी प्रवेश मिळाला. ही बातमी सांगायला मला मूर्तीने सिंगापूरमधून फोन केला आणि व्हाट्सअप वर मेसेजसुद्धा आला. मी त्याचे अभिनंदनही केले. पण काय सांगू..?? हा मूर्तीचा आणि माझा झालेला शेवटचा संवाद !! कारण पुढल्या आठच दिवसांनी मूर्तीला सिंगापूरमध्येच एका मॉलच्या एस्केलेटरवर चक्कर आली आणि तो भेलकांडत खाली येऊन कोसळला तो डोक्यावरच !! अपघात मोठा होता. हॉस्पिटलमध्ये मेंदूवर एक दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्याची पत्नी आणि मुलगी तातडीने सिंगापूरला रवाना झाल्या. मूर्ती कोमात गेला आणि नंतर त्याचा दोन चार दिवसातच मृत्यू झाला. योग असा, कि त्याच्या नातलगांनी सगळं तिथल्या तिथेच सिंगापूरमध्येच उरकल्याने मला त्याचे साधे अंत्यदर्शनही झाले नाही.
आपले आयुष्य हे एक प्रकारच्या विणलेल्या वस्त्रासारखं असतं. मूर्तीच्या अकाली जाण्याने ह्या वस्त्रातील बरीच वीण उसवली गेली. आता कधी काही विचार जर मूर्तीशी शेअर करण्यासारखे मनात आले, तर मी त्यांना अक्षरशः गाडून टाकतो. माझ्या ह्या मनस्वी मित्राला ही माझी भावपूर्ण सुमनांजली !! 🙏🌺🌺
********************************************************************************
सर्व रसिक वाचकांचे मनापासून आभार !!- विकास
ReplyDeleteविकासजी,मी मागे म्हटल्या प्रमाणे तुमची भाषा ओघवती,सहज,शैलीपुर्ण,उत्कंठावर्धक, व सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलाही साधा काय किंवा कठीण काय, विषय लोकांच्या गळी उतरवणे सोपे नसते आणि हे कौशल्य उपजतच असते असे मी मानते ते तुमच्याकडे आहेच.
ReplyDeleteतुमचा हा, "मूर्ती महान पण कीर्ती लहान" होता पण तुम्ही त्याची कीर्ती महान केलीत.खरोखरच उत्कृष्ट लेख,👍🙏
Simply superb.... Complete portrait. .
ReplyDeleteसहज सुंदर आणि अतिशय ओघवतं !! A very good sense of humor!! पुढे वाचत रहावसं वाटलं आणि मूर्ति मलाही भेटलाच .
ReplyDeleteSRC awadla Tu hi maja ghet jaglahes.Good !!