श्रीमान योगी ...रसग्रहण - भाग १ त्याचं असं झालं ..... एप्रिल महिन्यात आमची एक हुशार आणि कलाकार मैत्रीण सौ . अनिता कुलकर्णी ( USA) हिच्याबरोबर फोनवर संवाद चालू असताना ती सहज म्हणाली कि " विकास , एखाद्या विषयाचा अभ्यास कसा आणि किती खोलवर असू शकतो हे तुला पाहायचं असेल , तर तू ' श्रीमान योगी' ह्या कादंबरीची प्रा . नरहर कुरुंदकर यांची प्रस्तावना जरूर वाच ". मला एव्हढं इंजेक्शन पुरेसं होतं . थोड्याश्या शोधानंतर मला श्रीमान योगीची PDF आमची एक चोखंदळ वाचक मैत्रीण सौ . मिताली कोरडे हिच्याकडून मिळाली . मी टॅबवर रातोरात प्रस्तावना वाचली . वास्तविक ह्या ५० पानी प्रस्तावनेत कुरुंदकरांनी कादंबरीविषयी काहीच लिहिले नाहीये . त्यांनी शिवछत्रपतींचे चरित्र लिहिताना इतिहासकारांकडून , बखरकारांकडून आणि लेखकांकडून पूर्वी काय काय प्रमाद घडले त्याचा एक अभ्यासपूर्ण लेखाजोगा...
My perspectives on facets of life...