सर्जक आणि साधक गुरु ...पं. अरुण कशाळकर !! ------------------------------------------------------------------------------- सा धारण वीसेक वर्षांपूर्वीची घटना असावी. म्हणजे मी पेटीच्या थोड्याफार साथी करायचो तेव्हाची. माझे मेंटर आणि एके काळचे म.टा.चे संगीत समीक्षक कै. श्रीकृष्ण दळवी (उर्फ अण्णा) यांना मी विनंती केली, कि मला जरा अनवट रागांचे एक्सपोजर हवंय, तर मी काय करू ?? अण्णा लगेच म्हणाले कि मी तुला योग्य आणि अधिकारी व्यक्तीकडे घेऊन चलतो. आम्ही दोघं एका सुंदर सकाळी पं. अरुण कशाळकर यांच्या घरी म्हणजे मुलुंड येथील 'कविता' अपार्टमेंट येथे दाखल झालो. फार काही प्रस्तावना वगैरे अण्णांनी केली नाही. फक्त "इनको अनवट रागों के बारे मे कुछ बताइए" असं बुवांना मित्रत्वात सांगितल्याचं स्मरतंय. अरुणकाकांनी पण त्यावर लगेच 'येत चला इथे' असा अनौपचारिक पण आस्थेवाईक सल्ला मला दिला. त्यावेळी नोकरीमध्ये माझे खूप touring असायचे. त्यामुळे नंतर मी किती दिवस त्यांच्याकडे गेलो हे काही नक्की आता मला आठवत नाही. पण असंच एकदा गेलो असताना त्यांनी माझ्या हातात तंबोरा देऊन '...
My perspectives on facets of life...