Skip to main content

Posts

Showing posts from July, 2018

II पितृदेवो भव .. II

II पितृदेवो भव ..   II अत्ताच मी जुन्या मोबाइलमधले काही SMS बघत होतो. त्यांत बाबांच्या पोटाच्या ऑपरेशन संदर्भातील, सुचित्राने त्यावेळी मला पाठविलेले २ मेसेज पाहिले . पहिला मेसेज होता "Operation started" आणि दुसरा होता "operation successful ". मी दुबईला असताना हे सगळं अचानक घडलं. आदल्या दिवशी ऑपरेशन झाल्यावर लगेच मी रजा घेऊन आलो. पण बाबा ICU त होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर जास्त थांबता यायचं नाही. पण शस्त्रक्रिया करणारे डॉ. पटवर्धन  म्हणाले वयाच्या मानाने speedy recovery आहे. आम्ही निर्धास्त झालो. पण.... नंतर मात्र अनाकलनीय घडलं. रात्री १०.३० ची वेळ. आता थोड्याच वेळात झोपाझोप होणार होती. बाबा ICU त असल्याने ४ थ्या मजल्यावर आणि आम्ही एक रूम घेतली होती ती पहिल्या मजल्यावर होती. मी झोपण्यापुर्वी बाबांना भेटायला वर जाणार, एव्हढ्यातच मला निरोप आला कि वर बोलावलंय तुम्हाला ताबडतोब. मी अक्षरशः स्प्रिंट मारून वर आलो. बाबांना खूप वर्षांनी दम लागला होता. ऑक्सिजन आणि नेब्युलायझरचा मारा सुरु झाला. खोकल्याची उबळ आली म्हणून बाबांनी ऑक्सिजन मास्क बाजूला करू...