Skip to main content

Posts

Showing posts from April, 2019

'संगीत मंदारमाला'....एक देजाऊ अनुभव !!

संगीत मंदारमाला ... एक 'देजाउ' अनुभव !! स ध्या मला चहापान, खानपान ह्या धर्तीवर मराठी संस्कृतीपानाचा  योग आहे असं दिसतंय. गेल्या महिन्यात कै. वि स. खांडेकरांची १९७४ मध्ये ज्ञानपीठ विजेती ठरलेली  ‘ययाती’ कादंबरी पुनश्च वाचनात आली आणि भौतिकशास्त्रातील स्थितीस्थापकत्वाच्या (कि जडत्वाच्या ??) नियमाला डावलून माझा मेंदू अचानक उद्दीपित झाला. उदात्त मानवी जीवनमुल्ये आणि विकारी मने ह्यातील संघर्ष खांडेकरांनी इतक्या उत्कटतेने रंगवलाय, कि वाचक अक्षरशः दिग्मूढ होतो. त्यानंतर लगेचच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘सं.संन्यस्तखडग ’ हे नाटक बघितले. हे 'सिद्धार्थ गौतम' आणि शाक्य गणराज्याच्या इतिहासावर आधारित असलेले हे नाटक म्हणजे त्यांचे स्वतःचे देशप्रेम, बुद्धिमत्ता, तत्वज्ञान आणि अफाट  प्रतिभाशक्ती यांचा अपूर्व संगमच आहे. (त्याला जोड आहे वझेबुवांच्या चालींची आणि दीनानाथरावांनी एके काळी लोकप्रिय केलेल्या पदांची…!) बरं ह्या सगळ्याचा हँगओव्हर असताना, लगेच आठवड्याभरातच सांगलीच्या 'देवल स्मारक मंदिर' ह्या संस्थेने बसविलेल्या 'सं. मंदारमाला'  ह्या नाटकाचा नेटका प्रयोग...