जुळलेल्या पट्ट्या ....!! मी किती चांगलं संवादिनीवादन करतो किंवा कसे, हे खरंच मला माहित नाही. ते ऐकणाऱ्यांना नेमके ठाऊक असते. प्रत्येकाची अपेक्षा असते त्याप्रमाणे जो तो आपापले मत बनवतो. ते वेगवेगळ्या कार्यक्रमा दरम्यानच्या आणि नंतरच्या प्रतिक्रियांवरून माझ्यापर्यंत पोचते. पण थोडी फार संवादिनी वाजवता यायला लागल्यापासून माझी मात्र स्वतःकडून एकच अपेक्षा होती, की आपल्याला स्वप्नातलं पेटीवादन करता आलं पाहिजे आणि संगीताचा मनमुराद आनंद लुटता आला पाहिजे. आज वयाच्या ५८ व्या वर्षी का होईना, पण मला स्वतःला समाधान लाभेल इतके पेटीवादन मी करू शकतो आणि ह्या स्वप्नपूर्तीचे बरेचसे श्रेय माझे गुरुजी पं. विश्वनाथ कान्हेरे ह्यांना आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्लॉगवर प्रकाशित होणाऱ्या माझ्या ह्या लेखाचा सूर आहे .... श्रेयो S र्पणमस्तु !!🙏 सु प्रसिद्ध संगीतज्ञ व महाराष्ट्र टाइम्सचे एके काळचे नावाजले गेलेले संगीत समीक्षक कै . श्रीकृष्ण दळवी यांनी १९९७ साली ' स्वानंदी ' नावाची संस्था ठाण्यातील निवडक संगी...
My perspectives on facets of life...