Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

Guide....एक अनुभव !!

GUIDE... एक अनुभव   !! अ लीकडेच फेसबुकवरील 'पुस्तकप्रेमी' ह्या ग्रुपवर एका पुस्तकाच्या भाषांतरावर लिहून आले आणि लगेचच त्यातून स्फूर्ती घेऊन  मी  २६३ पृष्ठांचे मूळ इंग्रजी पुस्तक माझ्या मोबाईलवरच वाचून काढले. हे पुस्तक म्हणजे गेल्या शतकातील सुप्रसिद्ध साहित्यिक कै. आर. के. नारायण यांची १९५८ मध्ये प्रकाशित झालेली आणि गाजलेली ' THE GUIDE ' ही कादंबरी !! जणू काही देव आनंद आणि वहिदाचा 'गाईड ' हा  ह्या कादंबरीवर  बेतलेला  चित्रपट बघण्याची ही पूर्वतयारीच होय. पण  खरं म्हणजे  कादंबरी मला इतकी आवडलीय कि आता सिनेमा बघणे हे फक्त उपचार म्हणून बाकी होते. परंतु चित्रपट पाहिल्यावर  मात्र   'चार चांद लागले' असं वाटलं !! ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- ता मिळनाडूतील कल्पित मालगुडी शहरात ही कथा घडते. गुगलवरून कळलं की प्रस्तुत लेखकाच्या अनेक साहित्यकृती...