स्मरणरंजनाचे मोती....!! (Nostalgia) स तराव्या शतकात स्वित्झर्लंडच्या सोल्जर्सबद्दल (मर्सेनेरीज) एका डॉक्टरला एक विचित्र गोष्ट दिसली. दुसऱ्या देशात युद्धावर असताना ह्या सोल्जर्सना थकवा, निद्रानाश, हृदयाचे ठोके, अपचन, ताप यांसारखे आजार होऊ लागले. बरेच उपाय करून लक्षणे कमीच होईनात. अखेर सैनिकांना त्यांच्या सेवेतून मुक्त करून सोडण्यात आले व त्यांना त्यांच्या स्वतःच्या देशांतील घरी परत जावे लागले. हा 'होमसिकनेस'चा प्रकार होता. तत्कालीन डॉक्टरांनी सैनिकांच्या या मानसिक अवस्थेचे नाव 'नॉस्टॅल्जिया' असे ठेवले ....... (In Greek, "Nostos" for homecoming and and Algos for pain or longing). डॉक्टरांनी याचा निष्कर्ष असा काढला की औदासिन्यजवळचा (डिप्रेशन) असा हा एक रोग असावा. कालांतराने, नॉस्टॅल्जियाचा 'होमसिकनेस' हा अर्थ जाऊन 'भूतकाळाची तीव्र इच्छा' असा घेतला जाऊ लागला. गेल्या काही वर्षांत 'नॉस्टॅल्जिया' हा एक आनंददायी अनुभव म्हणून पाहीला जात आहे............. ___________________________________________________________________________...
My perspectives on facets of life...