वेडाची फलश्रुती ...!! ............................................................................................ नमस्कार मित्रांनो, आपणां सगळ्यांना शुभ दीपावली !! 'दीपावली' म्हणजे जशी दिव्यांची रांग तशीच रंगावली म्हणजे रंगांची रांग ! दिवाळीला रांगोळीमुळे मांगल्य आणि पूर्णत्व लाभते. अलीकडेच मी एक whatsapp वर श्री मकरंद करंदीकर यांची एक पोस्ट पहिली. त्याचे शीर्षक होते 'रांगोळ्या म्हणजेच हिंदू मंत्रोच्चारांचे Print Out ! ह्यामध्ये शास्त्रीय प्रात्यक्षिकाच्या पुराव्यासहित शाबीत केले होते की आपल्याकडे गृहिणी जी काही रांगोळीची डिझाइन्स काढतात, त्या मागे मंत्रोच्चारांनी केलेली कंपने आहेत. त्यामुळे पारंपरिक रांगोळ्यांना 'मंत्रचित्र असेही म्हणता येईल. अजून बरंच काही लिहिलं होतं. त्या पोस्टमधील "रांगोळीने एखाद्या फोटोसारखे हुबेहूब चित्र काढणे म्हणजे कलेची सर्वोच्च पातळी आहे " हे वाक्य वाचल्यावर मला छान वाटलं. कारण अशी कला सातत्याने जोपासणाऱ्या अनेक कलाकारांना ही जणू काही 'अधिकृत मान्यता' मिळाल्यासारखीच आहे. नाहीतर दिवाळी सोडून त्यांना बिचाऱ्यांना कोण विचार...
My perspectives on facets of life...