चोच ल्यांचे बंड ......!! "शरीराला व्यायाम आणि डाएटची गरज आहे , तसेच आत्म्याला बटाटा वडा व मिसळ पावची . आत्म्याचेच ऐकावे , कारण शरीर नश्वर आहे अणि आत्मा अमर आहे .....!!" ( <<--- Gyan from WA University 😆 ) गे ल्या वर्षी मी माझ्या पत्नी च्या पाकशास्त्र कौशल्यावर लिहिलेला ' किचन क्वीन ' हा लेख खूप viral झाला . तो वाचल्यावर एका भगिनीने तर मला विचारले कि तुम्ही खाद्यसंस्कृतीवर डॉक्टरेट करताय का ?? खरं म्हणजे विविध पदार्थांचा उल्लेख त्यांत असला , तरी पदार्थांच्या अभिरुचींवर फार काही लिहिलं नव्हतं . रोजच्या व्यवहारात आपल्याला अमुक एक गोष्ट आवडते , अमुक एक आवडत नाही , त्याची कारणे वगैरे गोष्टींवर चिंतन होते . ( कधीतरी मी introspection mode मध्ये असलो कि आत्मपरीक्षण होतच असते . भरपूर वेळ असतो ना मला 😀 ). उदा . पॅ...
My perspectives on facets of life...