मातृदेवो भव ...!! विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कि ह्या ब्लॉगमध्ये आतापर्यंत एकूण १८ लेख प्रकशित झालेत . काही व्यक्तिचित्रे, काही संगीतावरील लेख, काही विनोदी लेख , काही खाद्यसंस्कृतीवर, तर बाकी च्या अन्य काही विषयांवरील हा ब्लॉग मला कल्पनाही नव्हती असा आकार घेत आहे. माझ्या वडिलांवर देखील एक दीर्घ लेख आहे. पण जी व्यक्ती जन्मापासून माझ्या सगळ्यात जवळची आहे, त्या माझ्या जन्मदात्या 'आई'वर मी आत्तापर्यंत काहीही लिहिलेलं नव्हतं. काय बरं कारण असेल ?? ते कारण म्हणजे मनातली 'भीती' !! जी माउली " देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला; म्हणेन प्रभू रे माझे सारे जीवन देई मम बाळाला " हे दान देवाकडे मागते, तिच्या व्यक्तिमत्वाची व्याप्ती किती मोठी असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. ह्या तिच्या व्याप्तीची कल्पना सुद्धा करणं जिथे अवघड आहे , तिथे माझ्या सीमित लेखणीत ती पकडणं काही केल्या शक्य होणार नाही, ही ती 'भीती' होती. पण ह्या भीतीचे भूत पूर्णपणे डोक्यावर सवार व्हायच्या आतच १४ डिसेम्बरला ( किंवा ८५ व्या जयंतीला) म्हणजे बरोबर १ महिन्यापूर्वी मी लेख...
My perspectives on facets of life...