Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

सरवर कृष्णासमान.... !! 🎼🎼🎼

सरवर कृष्णासमान.... !!  'ये विविध भारती  की  विग्यापन प्रसारण सेवा है !!' हे प्रांजळ वाक्य अलीकडे ऐकू येत नाही. त्या मागोमाग लागणाऱ्या रब रब रब  रब  रबेक्स, दातो और मसुडो को धो डालनेवाला डाबर का लाल दंतमंजन,  प्रकाशचं माक्याचं आयुर्वेदिक तेल,  हिरो मॅजेस्टिक मोपेड, हमाssरा बजाज  वगैरे जाहिराती  पण आता  ऐकू येत नाहीत. कारण रेडिओ आता विस्मृतीत गेला आहे.  नाही म्हणायला अमीन सयानीचे 'बिनाका  गीतमाला ', कामगारसभेची  रेडिओवरील  ट्यून,  दूरदर्शनची ट्यून   वगैरे व्हाट्सअपवर पोस्ट करून सामुदायिकपणे  डोळ्यांतून  टिपे गाळून  नॉस्टाल्जिक  हळहळ व्यक्त  करण्याचा  कार्यक्रम अधूनमधून होत असतो.  आता आकाशवाणीच्या मराठी चॅनेलचे नांव 'अस्मिता' ठेवले असले, तरी मराठी रसिकांची रेडिओविषयीची 'अस्मिता' किंवा तळमळ केव्हाच लोप  पावली आहे. "कालाय तस्मै नम:" हेच खरं !!  अर्थात हे एकेकाळी ६० पैशांत मसाला डोसा खाणाऱ्या पन्नाशीच्या वरच्या पिढीबद्दल   मी बोलतोय. (नवीन पि...