एस. एल. भैरप्पा लिखित "आवरण" ह्या कादंबरीचे रसग्रहण "विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला 'आवरण' म्हणतात !!"- डॉ. एस . एल. भैरप्पा का दंबरीचे रसग्रहण लिहिताना कथानकाचा गोषवारा तरी निदान द्यावाच लागेल . पुस्तकातील सस्पेन्स जरा उघड केल्यासारखे होते . पण इलाज नाही . भैरप्पांच्या कादंबऱ्यांमध्ये कथानकाला एक प्रकारची खोली ही असते . २००९ मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी आहे . कर्नाटकातील ' हंपी ' ह्या एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याच्या राजधानीवर आधारित सरकारच्या हेरिटेज विभागातर्फे डॉक्युमेंटरी चित्रित होणार असते . राष्ट्रात मुलतत्ववाद उफाळून आल्याच्या काळात प्रेक्षकांच्या मनांत मुस्लिमविरोधी भावना निर्माण होऊ नयेत , ह्यासाठी हा प्रपंच होता . प्रत्येक सत्ताधारी हा प्रसार आणि प्रचार माध्यमातील आपले विशेष अधिकार वापरून सरकारची खुली किंवा छुपी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असे छोटे मोठे प्रकल्प हाती घेत अ...
My perspectives on facets of life...