‘ सं. मीरा मधुरा’ नाटकाचा रसास्वाद…! "मी लिहिलेलं माझं सर्वात आवडतं नाटक 'मीरा...मधुरा' !! नाट्यरूपानं रंगमंचावर प्रकट झालेलं ते एक मधुर भावकाव्य आहे .... " - कै. प्रा. वसंत कानेटकर २ महिन्यांपूर्वी मी पुण्याच्या सौ. शैला मुकुंद यांनी लिहिलेलं कै. पं. जितेंद्र अभिषेकी यांचं सुंदर चरित्र वाचलं. ते वाचताना बुवांनी संगीत दिलेली 'हे बंध रेशमाचे' आणि 'मीरा मधुरा' ही संगीत नाटके मी पाहू शकलो नाही ह्याची खंत लागून राहिली. पण स्वतः कानेटकरच म्हणाले होते कि "काही नाटकं रंगमंचावर प्रयोग करण्यासाठी नसतातच. ती एकांतात बसून वाचावीत आणि मनाच्या रंगमंचावर रंगत असलेलीच पाहावीत. म्हणून मीरा मधुरा मला जास्त आवडते ". असं म्हणून जणू काही त्यांनी माझ्या मनावर एक प्रकारची फुंकराचं घातली. मात्र आपण हे नाटक आपल्याला निदान वाचायला तरी हवं असंही वाटलं. म्हणून तिरीमिरीने मी लायब्ररीतून पुस्तक आण लं आणि हे नाटक खरोखरच मनाच्या रंगमंचावर पाहि लं , अनुभव लं . त्यातील मीरा आणि भोजराजाचे डायलॉग पुन्हा पु...
My perspectives on facets of life...