श्रीमानयोगी रसग्रहण ...भाग -२ भाग -१ मध्ये मांसाहेब जिजाबाईं केंद्रस्थानी होत्या. तसेच त्या वेळच्या काही निवडक चालीरीती आपण पाहिल्या. आज भाग -२ मध्ये शिवरायांचे वडील शहाजीराजे, शिवरायांचे गुरुवर्य दादोजी कोंडदेव, शिवाजी महाराजांचे व्यवस्थापकीय कौशल्य, तसेच शिवबांवरील जिजाऊंचे काही प्रासंगिक संस्कार आपण कादंबरीच्या अनुषंगाने बघणार आहोत . सा धारण १६३६ चा सुमार असावा. पुणे मुलूख स्थिर झाला. पण दक्षिणेत निजामशाहीचा अस्त झाला. शहाजीराजांनी न डगमगता स्वतः फौज उभारली; आणि मोंगलांशी सामना दिला. कादंबरीकार लिहितात "एका जहागीरदाराने नवा बंडावा उभारून मोंगली सत्तेला तोंड देणारे असे उदाहरण विरळच !!". शहाजीराजांच्या शौर्यगुणांची यावरून आपल्याला कल्पना येते. प्रस्तावनेत कुरुंदकर लिहितात "निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि सर्व सरदार यांनी परस्पर सहकार्याने मोंगलांशी लढावे, त्यांना दक्षिणेत येऊ देऊ नये ह्या धोरणाचे आरंभकर्ते शहाजीराजे होते. "बंगळूरला संभाजी (शिवाजीचे मोठे बंधू) आणि पुण्याला शिवाजी यांच्या सर्व वा...
My perspectives on facets of life...