Skip to main content

Posts

Showing posts from June, 2025

पर्व .... एक मंथन !!

  पर्व .... एक मंथन !! " साहित्यकृतीचे मूलद्रव्य मानवी भाव - भावना , आशा - आकांक्षा , सुख - दुःख हेच असतं ; इतिहासाचा तपशील नव्हे " -   एस. एल. भैरप्पा " महाभारत   आपलं आपणच समजून घ्यायचं असतं . त्याचा अन्वयार्थ आपणच लावायचा असतो . त्यासाठी संदर्भग्रंथ नाहीत , तर मनन   आणि चिंतन आवश्यक असते " - ज्येष्ठ विचारवंत कै . दाजीशास्त्री पणशीकर पर्व ह्या महाभारतावरील कादंबरीत नेमके काय असेल , हे भैरप्पांच्या वरील वाक्यातून लक्षांत येतं . मला नेमक्या त्या मूलद्रव्यातच रस आहे. ह्या मूलद्रव्यांचा संयोग घडवून भैरप्पांनी महाभारतावरचे असे काही बेमालूम ‘रसायन’ तयार केले आहे, कि मी अगदी रात्रीचा दिवस करून ही कादंबरी वाचली.  लेखाच्या  शीर्षकात जरी 'मंथन' असा शब्द आला असला, तरी ह्या लेखाची व्याप्ती एव्हढी मोठी निश्चितपणे नाही. मंथन होण्यासाठी विषयाचा प्रचंड अभ्यास लागतो. कदाचित हे फक्त ‘कथानक’ नाही एव्हढाच ह्या शीर्षकाचा अर्थ  आहे . पण ही कादंबरी वाचताना बऱ्याच ठिकाणी मी घुटमळत राहिलो, विशेष करून जिथे जिथे रूढी ...