बटाटे वडा अ स्सल मराठी रसिक खवय्याला खाताना बेभान करणारे ' बटाटे वडा ' हे खाद्य किती जुनं आहे, ह्याचा तपशील माझ्याकडे नाही. पण माझ्या नाबाद ६४ वर्षांच्या इनिंग मधली निदान ५० वर्षे तरी ह्या खाद्याने मला खाण्यातला कदाचित क्षणिक पण स्वर्गीय आनंद दिलाय. असे म्हणतात कि दादरच्या अशोक वैद्य यांनी १९६६ साली दादर स्टेशनच्या बाहेर पहिला वडा पावचा स्टॉल टाकला होता. खरं म्हणजे हा वडा पाव आणि मिसळ पाव ह्या दोन गोष्टी आर्थिक दुर्बल घटकांसाठी सुरु झाल्या होत्या. पण आमच्यासारख्या पांढरपेशा वर्गाने त्यावरही यथेच्छ ताव मारून त्यांचे भाव वाढवले आणि मूळ उद्देश नाहीसा झाला. १९७०च्या सुमारास आम्ही गिरगांवात असताना आमच्या लहानपणी माझी आई कधीतरी बाहेरून येताना बाहेरून आम्हां सर्वांसाठी बटाटेवडा आणीत असे. (माझी आई तेव्हा क्लासला जाऊ...
My perspectives on facets of life...