Skip to main content

Posts

Showing posts from October, 2025

बरसन लागी रे...!!

   बरसन लागी रे...!!  मला शास्त्रीय संगीताची खरी आवड १९८० साली लागली असे म्हणता येईल. आणि प्रगतीही झपाट्याने झाली. आमच्या इन्स्टिटयूटमध्ये कल्चरल ट्रॉफीसाठी होणाऱ्या स्पर्धांमध्ये मला वाद्यवादन  स्पर्धेत १९८१, ८२, ८३, ही सलग ३ वर्षे मला प्रथम पारितोषिक होते.  शास्त्रीय संगीत फार काही जाणकारीने नाही, तरी जाणीवपूर्वक ऐकता येऊ लागले. त्यामुळे सुरवातीच्या काळात प्रत्यक्ष ऐकलेल्या उत्तम कलाकारांच्या मैफिलीतील असे कितीतरी प्रसंग सांगता येतील, कि आजही ते स्मरणरंजनाचा आनंद देतील. किशोरीताईंचा हुसैनी तोडी व मीरा मल्हार,  संगीत मार्तंड जसराजजींचे गोरख कल्याण व जोग राग (१९९२-IIT), अभिषेकी बुवांचा धीरगंभीर जोगकौन्स ( १९८० ठाणे), भीमसेनजींचा सवाईला गायलेला भारदस्त रामकली (१९८२), वसंतरावांचा 'छेडो ना छेडो' वाला खेळकर बिहाग ( गडकरी, ठाणे), परवीन सुलतानाचा आसदार गुजरी तोडी ( सवाई , १९९२), मालिनीताईंचा मारवा ( ठाणे ), बिरजू महाराज -झाकीर अभूतपूर्व जुगलबंदी ( १९८१- IIT ), उल्हास कशाळकरांचा बसंत बहार ( २००१, ठाणे ) गंगुबाईंचा अवाढव्य पुरिया ...