Skip to main content

Posts

Showing posts from March, 2026

स्व. खुशवंतसिंग

स्व. खुशवंतसिंग यांचे विचार आणि मते ( त्यांच्या एका पुस्तकातून). .. --------------------------------------------  एकंदरच मला वादळी माणसांबद्दल कायमचे कुतूहल वाटत आले आहे.  एकेकाळचे वादळी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व, तसेच इलस्ट्रेटेड विकलीचे संपादक स्व. खुशवंतसिंग यांची 'ट्रेन टू पाकिस्तान' ही इंग्रजी कादंबरी  ४-५ वर्षांपूर्वी  वाचली. त्यामागोमाग ह्या कादंबरीवर बेतलेला सिनेमा देखील  लगेच  पाहिला होता. यामुळे १९४७ साली झालेल्या भारत पाकिस्तान फाळणीचा थोडाफार तरी अंदाज आला. खुशवंतसिंगांचा जन्म लाहोरचा ! फाळणीच्या वेळी ते ३२ वर्षांचे होते; म्हणजे त्यांच्या उमेदीच्या वर्षांत त्यांनी भयंकर हिंदू मुस्लिम दंगलीतील रक्तपात बघितला.  एव्हढेच नव्हे, तर  त्यावेळच्या  कित्येक पिडीतांसारखे त्यांनाही लाहोर सोडून दिल्लीला यावे लागले. तत्पूर्वी LLBचे शिक्षण त्यांनी लंडनमध्ये पूर्ण केले. लाहोरमध्ये ते वकिलीही करत असत. तर अशा ह्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे लेखन हे कित्येक दृष्टीने मार्मिक आणि महत्वाचे असते. अलीकडे त्यांचे 'मन:पूर्वक खुशवंतसिंग' हे पुस्तक माझ्या ह...