Skip to main content

Posts

श्रीमानयोगी रसग्रहण ...भाग -२

  श्रीमानयोगी रसग्रहण ...भाग -२ भाग -१ मध्ये मांसाहेब जिजाबाईं केंद्रस्थानी होत्या. तसेच त्या वेळच्या काही निवडक चालीरीती आपण पाहिल्या.  आज भाग -२  मध्ये  शिवरायांचे वडील शहाजीराजे, शिवरायांचे गुरुवर्य दादोजी कोंडदेव,  शिवाजी महाराजांचे व्यवस्थापकीय कौशल्य,  तसेच  शिवबांवरील  जिजाऊंचे काही  प्रासंगिक  संस्कार आपण  कादंबरीच्या अनुषंगाने  बघणार आहोत .  सा धारण १६३६ चा सुमार असावा. पुणे मुलूख स्थिर झाला. पण दक्षिणेत निजामशाहीचा अस्त झाला. शहाजीराजांनी न डगमगता स्वतः फौज उभारली; आणि मोंगलांशी सामना दिला. कादंबरीकार लिहितात "एका जहागीरदाराने नवा बंडावा उभारून मोंगली सत्तेला तोंड देणारे असे उदाहरण विरळच !!". शहाजीराजांच्या शौर्यगुणांची यावरून आपल्याला कल्पना येते. प्रस्तावनेत कुरुंदकर लिहितात "निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि सर्व सरदार यांनी परस्पर सहकार्याने मोंगलांशी लढावे, त्यांना दक्षिणेत येऊ देऊ नये ह्या धोरणाचे आरंभकर्ते शहाजीराजे होते.  "बंगळूरला संभाजी (शिवाजीचे मोठे बंधू) आणि पुण्याला शिवाजी यांच्या सर्व वा...

‘मीरा मधुरा’ नाटकाचा रसास्वाद…!

  ‘ सं.   मीरा मधुरा’   नाटकाचा रसास्वाद…!   "मी लिहिलेलं माझं सर्वात आवडतं नाटक 'मीरा...मधुरा' !! नाट्यरूपानं रंगमंचावर प्रकट झालेलं ते एक मधुर भावकाव्य आहे .... " - कै. प्रा. वसंत कानेटकर  २ महिन्यांपूर्वी मी  पुण्याच्या सौ. शैला मुकुंद यांनी लिहिलेलं  कै. पं. जितेंद्र अभिषेकी यांचं सुंदर चरित्र वाचलं. ते वाचताना बुवांनी संगीत दिलेली 'हे बंध रेशमाचे' आणि 'मीरा मधुरा' ही संगीत नाटके मी पाहू शकलो नाही ह्याची खंत लागून राहिली. पण स्वतः कानेटकरच म्हणाले होते कि "काही नाटकं रंगमंचावर प्रयोग करण्यासाठी नसतातच. ती एकांतात बसून वाचावीत आणि मनाच्या रंगमंचावर रंगत असलेलीच पाहावीत. म्हणून मीरा मधुरा मला जास्त आवडते ".  असं म्हणून जणू काही त्यांनी माझ्या मनावर एक प्रकारची फुंकराचं घातली.  मात्र आपण हे नाटक आपल्याला  निदान  वाचायला तरी  हवं  असंही वाटलं. म्हणून तिरीमिरीने मी लायब्ररीतून पुस्तक आण लं  आणि  हे नाटक  खरोखरच मनाच्या रंगमंचावर पाहि लं  , अनुभव लं . त्यातील मीरा आणि भोजराजाचे  डायलॉग पुन्हा पु...