Skip to main content

Posts

Showing posts from April, 2026

लिहून मुक्ती मिळविलेला माणूस - खुशवंतसिंग

  लिहून मुक्ती मिळविलेला माणूस - खुशवंतसिंग  खुशवंतसिंग ...!! ह्या गृहस्थाची २ पुस्तके वाचुन सुद्धा माझे त्यांच्याविषयी कुतूहल म्हणावे तसे  शमले नाही.  त्यांचे अंतरंग कळले नव्हते एव्हढाच त्याचा अर्थ.  म्हणून मी तातडीने त्यांचे आत्मचरित्र आणले आणि १०-१५ दिवसात वाचून संपविले. ब्लॉग लिहिण्याची इच्छा दोन कारणांनी झाली ...१) लेखक आणि व्यक्ती म्हणून त्यांचा प्रवास कसा झाला हे वाचकांना सांगणे   २) आदत से मजबूर म्हणून......  बघुयात किती जमते लिहायला ते ... आ धी खुशवंतसिंग यांचे बालपण कसे गेले, ते पाहुयात.  खुशवंतसिंग यांचे बालपण आणि अर्धे तारुण्य स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. ( आणि ह्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुढील कर्तृत्वाचे तसेच कार्याचे मूल्यमापन व्हायला हवे).  त्यांचा जन्म १९१५ साली थरच्या वाळवंटातील हदाली (जे आता पाकिस्तानात आहे ) येथील संपन्न कुटुंबात झाला. कुटुंब आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत होते. त्यांच्या खापर-पणजोबांचा मिठाचा धंदा होता. साधारण पहिले महायुद्ध संपल्यावर त्यांना भूखंडाच्या स्व...