Skip to main content

Posts

Showing posts from 2017

मुलतानीचं गारुड

मुलतानी चं  गारुड                                            मी शास्त्रीय संगीतातील  ' फ्री लान्सर' आहे .  पण  हे संगीत समजून घेण्यासाठी आणि मांडण्यासाठी जी काही भक्ती लागते , ती माझ्या कुवतीनुसार मी अजूनही करतो . अर्थार्जनाशी मात्र त्याचा संबंध मी ठेवलेला नाही . एखाद्या रागाने एकदा का मला भुरळ घातली , कि मी निदान दोन तीन महिने त्या रागात असतो . यापूर्वी अशा अनेक रागांशी माझी प्रेम प्रकरणे झाली आहेत . उदा . पुरिया कल्याण , नट भैरव , तोडी , चारुकेशी , गोरख कल्याण , गौड मल्हार , काफी कानडा ..... वगैरे !!  ह्या ब्लॉगमध्ये ' मुलतानी'   रागावर माझे   प्रेम   कसे   कसे  जडत गेले , हे मी जरा विस्ताराने लिहिलं आहे ......  ----------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------- ५ वर्षांपूर्व...

आमचा कॉम्रेड दादामामा.....!!

 आमचा  कॉम्रेड दादामामा.....!!                                                     " "वैयक्तिक जीवन क्षणभंगुर असते, पण मानवता चिरंतन आहे.... "  - कॉम्रेड  कै. श्री. ल. पुरोहित ( "... आत्मकथन"- पृष्ठ क्र.  २१७ ) --------------------------------------------------------------------------------------- ख रं सांगायचं तर आज मी एका आभाळाएव्हढ्या व्यक्तिमत्वाला चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्यांचं नांव आहे कॉम्रेड श्रीराम लक्ष्मण पुरोहित !!  तो माझा सख्खा मामा होता, हे लिहिताना मला खूप अभिमान वाटतो. चिमटीत पकडण्याचा एव्हढा अट्टाहास तरी का असं कुणी म्हणेल. पण आजचा दिवसच तसा आहे. आज १ मे - म्हणजे कामगार दिन ! ह्या दिवशी आमच्या कॉम्रेड   मामाचे स्मरण आम्हां सर्वांना झाले नाही तरच नवल. कम्युनिझमच्या इतिहासाचा आणि मूलभूत तत्वांचा सांगोपांग अभ्यास करून ती प्रत्यक्षात आणणा...

एक भन्नाट व्यक्तिमत्व... सुधीर !!

**  एक भन्नाट व्यक्तिमत्व... सुधीर !!**                                                                              मा झी एक सवय आहे. माझे ज्यांच्याशी सूर जुळले, त्यांची दोस्ती मी सहसा स्वत:हुन सोडत नाही. सुधीर माझा सख्खा चुलत भाऊ. सुधीरची आणि माझी झालेली १५-२० वर्षांची दोस्ती शेवटपर्यन्त कायम राहिली, जरी तो माझ्यापेक्षा १०-११ वर्षांनी मोठा होता. त्याचं असं झालं……  सुधीर माझ्याआधी काळे सरांकडे गाणं शिकत असे.  त्याच्याकडे एक छोटीशी पेटी देखील होती (जी त्याने मला १ वर्ष वापरायला दिली होती). कुठल्याही रागाचे तान पलटे घोटताना मी सुधीरला कधीही पहिले नाही. त्यामुळे पुरेसा रियाज नसल्यामुळे कि काय पण, तो गुरुपौर्णिमेला कुठलाही राग वगैरे म्हणत नसे. “घननीळा लडिवाळा”व “संगीतरस सुरस मम” ही दोन गाणी त्याने गुरुपौर्णिमेला म्हटल्याचे स्मरते. पण त्याला शास्त्रीय स...