आमचा कॉम्रेड दादामामा.....!! " "वैयक्तिक जीवन क्षणभंगुर असते, पण मानवता चिरंतन आहे.... " - कॉम्रेड कै. श्री. ल. पुरोहित ( "... आत्मकथन"- पृष्ठ क्र. २१७ ) --------------------------------------------------------------------------------------- ख रं सांगायचं तर आज मी एका आभाळाएव्हढ्या व्यक्तिमत्वाला चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्यांचं नांव आहे कॉम्रेड श्रीराम लक्ष्मण पुरोहित !! तो माझा सख्खा मामा होता, हे लिहिताना मला खूप अभिमान वाटतो. चिमटीत पकडण्याचा एव्हढा अट्टाहास तरी का असं कुणी म्हणेल. पण आजचा दिवसच तसा आहे. आज १ मे - म्हणजे कामगार दिन ! ह्या दिवशी आमच्या कॉम्रेड मामाचे स्मरण आम्हां सर्वांना झाले नाही तरच नवल. कम्युनिझमच्या इतिहासाचा आणि मूलभूत तत्वांचा सांगोपांग अभ्यास करून ती प्रत्यक्षात आणणा...
My perspectives on facets of life...