............................................................................................
नमस्कार मित्रांनो,
'दीपावली' म्हणजे जशी दिव्यांची रांग तशीच 'रंगावली' म्हणजे रंगांची रांग ! निदान महाराष्ट्रात तरी लोक 'दीपावली ' हा सण सगळ्यात उत्साहाने साजरा करतात. दिवाळीतील उत्सवी वातावरणाला रांगोळीमुळे मांगल्य आणि पूर्णत्व लाभते.
अलीकडेच मी एक WA वर श्री मकरंद करंदीकर यांची एक पोस्ट पहिली. त्याचे शीर्षक होते 'रांगोळ्या म्हणजेच हिंदू मंत्रोच्चारांचे Print Out !' ह्यामध्ये शास्त्रीय प्रात्यक्षिकाच्या पुराव्यासहित शाबीत केले होते की आपल्याकडे गृहिणी जी काही रांगोळीची डिझाइन्स काढतात, त्या मागे मंत्रोच्चारांनी केलेली कंपने आहेत. त्यामुळे पारंपरिक रांगोळ्यांना 'मंत्रचित्र' असेही म्हणता येईल. अजून बरंच काही लिहिलं होतं. त्या पोस्टमधील "रांगोळीने एखाद्या फोटोसारखे हुबेहूब चित्र काढणे म्हणजे कलेची सर्वोच्च पातळी आहे " हे वाक्य वाचल्यावर मला छान वाटलं. कारण अशी कला सातत्याने जोपासणाऱ्या अनेक कलाकारांना ही जणू काही 'अधिकृत मान्यता' मिळाल्यासारखीच आहे. नाहीतर दिवाळी सोडून त्यांना बिचाऱ्यांना कोण विचारतो ..??
ठाण्यातली रंगावली प्रदर्शने दर वर्षी खूप गर्दी खेचतात असा अनुभव आहे. अगदी आबालवृद्ध मंडळी न्यू इंग्लिश स्कुल, मो. ह. विद्यालय आणि १९ नंबरच्या महापालिका शाळेत भरलेल्या प्रदर्शनांना उस्फुर्त प्रतिसाद देतात. ठाण्यातील दीपोत्सवाचा तो एक भागच असतो म्हणा ना. ह्या दिवाळीच्या निमित्ताने १९८३ साली मी काढलेल्या एका रांगोळीचा 'अविस्मरणीय अनुभव' ह्या ब्लॉगमध्ये थोडक्यात कथन केलाय........-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
योगायोगाने २ गोष्टी जवळ आल्या होत्या. एक म्हणजे दिवाळी आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सख्ख्या बहिणीचा साखरपुडा !! मनाशी खूणगाठ बांधली आणि ठरल्याप्रमाणे रविवारी संध्याकाळी मी IIT त पोचलो. पण मुलाखतीला पोचण्यापूर्वी आधी लगबगीनं त्या स्टॉलवर गेलो. रविवार असल्याने स्टॉल बंदच होता आणि कॉरिडॉरमध्ये सगळे सामसूम होते. एरवी सुद्धा ह्या संस्थेतील बहुसंख्य मुले अभ्यासू असल्याने सुट्टीच्या दिवशी इकडं तिकडं करणारी नव्हती. आणि विकेंडला बरीचशी मुले घरीही जायची. एखाद्या सिनेमातल्या खलनायकाप्रमाणे मी मागे-पुढे कोणी नाही असे पाहून चक्क कॅन्टीनच्या सर्व्हिन्ग टेबलवर चढून ती सेलोटेपने भिंतीवर चिकटवलेली जाहिरात उचकून काढली आणि माझ्या शबनम बॅगमध्ये टाकली. ( काय उत्साह आहे पहा !! 🙆). तिथून सरळ इलेक्ट्रिकलला जाऊन तेंडुलकरांची मुलाखतही ऐकली. नेहमीच फ्रेंच कट का कसलीशी जोड-रागासारखी स्पेशल दाढी राखणारे तेंडुलकर शांत आणि रुबाबदार व्यक्तिमत्वाचे होते. मला अजूनही आठवतंय, त्या दिवशी ते खादी करड्या मरून कलरचा गुरुशर्ट घालून आले होते. मुलाखत छानच रंगली आणि मी त्यानंतर रात्री मी सरळ होस्टेलवर गेलो.
बरोब्बर एक आठवड्याने माझ्या बहिणीचा साखरपुडा होता. योगायोगाने नेमका तोच दिवस प्रदर्शनात रांगोळी काढायचा शेवटचा दिवस होता. कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी प्रदर्शन चालू होणार होते. खरं म्हणजे साखरपुड्याच्या दिवशी संध्याकाळी तसे माझे घरी काही काम नव्हते. पण अशा महत्वाच्या मंगल दिवशी घरच्यांच्या आग्रहाखातर घरी राहणे क्रमप्राप्तच होते. आणि रांगोळी वगैरे काढण्याच्या माझ्या ह्या 'हट के' असलेल्या उद्योगाला सरळ परवानगी मिळालीच असती असं मला वाटलं नाही. बहिणीचा साखरपुडा छानच झाला. पण इथे ह्या मुस्लीम म्हाताऱ्याच्या फोटोने मला झपाटून टाकले होते ना, त्यामुळे त्याला रांगोळी स्वरूपात डोक्यावरून जमिनीवर उतरवणे भाग होते. (एकदा डोक्यात एखादी कल्पना आली कि ती अमलात येईपर्यंत तिचा पाठपुरावा करत राहणे ही माझी जुनी खोड आहे). शेवटी मी घरी लोणकढी थाप मारली ...." उद्या सोमवार असल्याने आमची weekly टेस्ट आहे आणि माझा अभ्यास झाला नाहीये, त्यामुळे आज रात्री आय .आय .टी. मध्ये जावे लागेल". ही मात्रा बरोब्बर लागू पडली आणि निदान घराच्या बाहेर पडण्याची परवानगी मिळाली. मी रात्रीचे जेवण आटोपून घरातून निघून थेट मो.ह. विद्यालयाच्या चकडबंद नव्हे तर 'हवाबंद' वर्गात दाखल झालो. दिवाळीच्या सुट्टीमुळे शाळा तशी बंदच होती. बाहेरून वारा किंवा धूळ वर्गात येऊन रांगोळ्या खराब होऊ नयेत यासाठी पुरेशी काळजी माजी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते घेत असत. आधी नांव दिल्यामुळे माझ्या रांगोळीसाठी एक स्लॉट राखून ठेवण्यात आला होता. त्या वेळचे नामवन्त आणि बुजुर्ग रांगोळीपटू श्री गुणवंत मांजरेकर हे न्यू इंग्लिश स्कुलला अर्धा वर्ग व्यापेल एव्हढी एक महाकाय रांगोळी दर वर्षी काढत. ती बघायला तुफान गर्दी व्हायची. माझ्यासाठी तर हे मोठेच प्रेरणास्थान होते. आमच्या मो. ह. च्या प्रदर्शनालाही उदंड प्रतिसाद मिळत असे. इथे श्रीरंग गायकवाड, विंचूरकर , प्रदीप पाटील, आमच्या वर्गातला चंद्रकांत साळवी असे कसलेले आणि व्यावसायिक रांगोळीपटू होते. गमतीची गोष्ट म्हणजे नेमका माझ्या बाजूची रांगोळी रेखाटणारा कलावंत होता त्या वेळचा गाजलेला रांगोळीपटु श्रीरंग गायकवाड !! त्याने 'आयुष्याची दोन टोके' ही त्यावेळची आचार्य रजनीशांची गाजलेली रांगोळी काढायला सुरवातही केली होती. मी पोचेस्तोवर स्मिता पाटील, अमोल पालेकर, सुनील गावस्कर अशा काही सुंदर रांगोळ्या आधीच रेखाटल्या गेल्या होत्या. माझा हा मुसलमान म्हातारा काही कुणी प्रसिद्ध व्यक्ती नव्हती, त्यामुळे रांगोळी उत्तम येणे गरजेचे होते. (नाहीतर तिला फारसा प्रतिसाद मिळाला नसता). पण खरं सांगायचं तर असं काही माझ्या डोक्यात तेव्हा नव्हतं बरं का . एकदा एखादा राग डोक्यात आला, कि तो गायल्या - वाजविल्याखेरीज आपल्याला चैन नसते. मग तो आपण किती चांगला म्हणतो, त्याची आपल्याला पर्वा नसते. (Unburdening the creative baggage or releasing the creative discontent is intended here). तर तशी काहीशी भारित मानसिक स्थिती होती माझी.
मी साधारण ४.५ फूट बाय ३.५ फूट आकाराचा मोठ्ठा ब्राऊन पेपर मला दिलेल्या जागेत बेताने खळ लावून व्यवस्थित चिकटवला. तो वाळल्यावर ६बी ह्या सगळ्यात डार्क पेन्सिलीने स्केच काढायला सुरवात केली. सुदैवाने तेव्हा मला पेन्सिल स्केचिंगची सवय असल्यामुळे चित्र मनासारखे आले. पोट्रेटमध्ये जेव्हढे 'डिटेल्स' चेहऱ्यावर असतील तेव्हढे ते काढण्यासाठी उत्तम असते असा सर्वसाधारण नियम असतो. चेहऱ्यावर सुरकुत्या , आठ्या, खळ्या असणं हे चित्रकारासाठी 'कुरण' असतं !! अर्थात ते जसंच्या तसं काढणंही त्याच हिशेबात अवघड आणि कौशल्याचं असतं. म्हाताऱ्याच्या ह्या फोटोमध्ये चितारण्यासाठी एव्हढे डिटेल्स होते कि काढणार्याची दमछाक होईल. अर्थात हे मला माहित होतं आणि त्यामुळेच मी ह्या चित्राची निवड केली होती. पण माझ्या मनाने ते 'आवाहन' केव्हाच आणि स्वतःहून स्वीकारले असल्याने माझ्यासाठी गोष्टी सोप्या होत गेल्या. माझी रांगोळी रंगीत नसल्यामुळेही काम थोडे सोपे झाले. पहिले आवाहन म्हाताऱ्याने डोक्याला गुंडाळलेल्या फेट्याचे होते. माझे object drawing जरा बरे असल्याने आणि माझी एलिमेंटरी-इंटरमीडिएट परीक्षांची ड्रेपरी शेडिंगची यादगारी अजून शिल्लक असल्याने, कापडावरील चुण्या, घड्या वगैरे मला नीट शेडींग देऊन काढता आल्या. गेल्या ३ वर्षांच्या अनुभवावरून 'रांगोळी' हे माध्यम शेडिंगसाठी पेन्सिल आणि चारकोलपेक्षाही मला नेहमीच जवळचे, लवचिक आणि सोपे वाटले. भीड चेपली आणि मी उत्साहाने चित्रातील म्हाताऱ्याच्या भालप्रदेशाकडे सरकलो. कपाळावरील लाईट इफेक्ट्समुळे हे हुबेहूब रेखाटणे खूप अवघड होते. विशेष करून कपाळावरील 'आठ्या' ह्या आडव्या गंधासारख्या न वाटता त्यांना 'स्किनचा 3D फील' येणे महत्वाचे होते. पण तेही प्रयत्नांती जमले. आज तकदीर माझ्यावर फिदा होते. कपाळावरील रिफ्लेक्टीव लाईट-शॅडो इफेक्ट्स नीट जमल्याने चित्र हळूहळू कंट्रोलमध्ये येतंय ही भावना द्दढ होऊ लागली. ( एव्हढ्यात वडा पाव आणि चहा आला. ह्या छोट्या ब्रेकनंतर ताजेतवाने वाटले. ) आता नाकडोळ्याचे खास आणि शार्प मुसलमानी फीचर्स रांगोळीतून दृगोच्चर होणे महत्वाचे होते. मूळ स्केच चांगले आल्याने हेही बऱ्यापैकी साधले गेले. वयोवृद्ध व्यक्तीचे डोळे हसताना थोडे 'किलकिले' अथवा 'मिचमिचे' होतात. ते जर नीट आले, तर तर पोर्ट्रेटमधले व्यक्तिमत्व खऱ्या अर्थी साकार झाले असे म्हणता येते. एक प्रकारचा योगच असतो तो !! मी ह्या भागात अक्षरशः जीव ओतला आणि तासा दोन तासातच म्हातारा मिस्किलपणे हसून माझ्याकडे पाहू लागला. शेजारीच तन्मयतेने रांगोळी काढत असलेल्या गायकवाडचीही दाद आली. ही मोट्ठी पावती होती!! नंतरचे आव्हान दाढीचे केस गुंतवून काढण्याचे होते. ह्याने मात्र चांगलेच माझे घामटे काढले. माझ्याकडे आता फार फार तर २ तास होते. कारण ७ वाजता पवईला जायला निघायचे होते. पण दाढी 'मुसलमानी' असल्याने तो 'लूक' मला कसाबसा देता आला. ( दाढी अंमळ थोडीशी 'मुल्ला-मौलवी' स्टाईल आलेय हे खरंय, पण त्यामुळे म्हातार्याचे धर्मांतर मात्र झाले नाही 😆). आता 'इप्सित' चित्र मनासारखे साकार झाले होते. रांगोळीवर उंचवटे न येता फिनिशही छान आला होता. पहाटेचे ६ वाजले होते. आठ नऊ तास नॉनस्टॉप वाकून रांगोळी काढल्यामुळे अंग आता आंबून गेले होते. कशीबशी बॅकग्राउंड आणि बॉर्डर पूर्ण केली. एका पोऱ्याने स्टीलच्या ग्लासातून आणलेला refreshing चहा घेऊन आणि मी पवईचा रस्ता धरला.....
आय. आय. टी. पर्यंतचा पाऊण तासाचा सगळा प्रवास 'उन्मीलन' अवस्थेत किंवा 'हँगओव्हर'मध्ये झाला. हॉस्टेलमध्ये शिरलो. रस्त्यात भेटलेला एक मित्र म्हणाला " काय रे कात्रे, आज एकदम खुश दिसतोयस.... ". कदाचित माझ्या वेडाला मोकळी वाट मिळाल्याने माझ्या चेहऱ्यावर विलसणारे समाधान त्याला कुठेतरी जाणवले असावे." Students faces often take on a glow as they contact their creative energy"- Julia Cameron ( Author of The Artist's Way)
प्रदर्शनाच्या बाहेरच्या द्वारी प्रतिक्रियेसाठी एक वही ठेवण्यात आली होती. त्यामध्ये 'ह्या' रांगोळीबद्दल बऱ्याच चांगल्या प्रतिक्रिया लिहून आल्या होत्या. एका दिनेश गांधी नावाच्या रसिकाने हेही लिहिलं होतं "म्हातारा हिंदू असता, तर आणखी छान वाटलं असतं ". ते ठीकच आहे. पण आपण काहीतरी विशेष कलात्मक करायचं ठरवलं आणि ते परमेश्वरकृपेने प्रत्यक्षात आल्यामुळे मला एक 'sense of achievement ' ची भावना आली होती हे अजूनही चांगलं आठवतंय. काही मुलखावेगळी 'वेडं' चांगली असतात आणि त्यांची 'फलश्रुती' चिरकाल मनांत टिकून राहते.😊
मोबाईल : ९८३३६१०८७५
*********************************************************************************************

🙏🙏🙏🙏🙏👌👌👍👍👍
ReplyDeleteThanks Rishi !!
DeleteVikassinh Raangoli ani Lekh donhi Aapratim Khup chan Tanmaytene Rekhatleli Sundar Kalakruti Shreeram
ReplyDeleteHari Om Swativeera, utsaha vadhavnarya abhiprayabaddal manapasun abhar !!Shreeram Ambadnya Nathsamvidh !!
DeleteExcellent तुझे शब्दांकन फारच समर्पक आणी अप्रतिम आहे.thoroughly enjoyed going
ReplyDeletethrough
Shailesh, many thanks for sending encouraging abhipraya..!!
DeleteExcellent तुझे शब्दांकन फारच समर्पक आणी अप्रतिम आहे.thoroughly enjoyed going
ReplyDeletethrough
लेख छान. तुमची रांगोळी रेखाटताना तल्लीनता जाणवते.
ReplyDeleteरांगोळी अप्रतिम.
नमस्कार ! आपलं नाव कळलं नाही. उत्साहवर्धक अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !!
DeleteSunder Rangoli aani Apratim lekh.
ReplyDeleteAmbadnya and Nathsanvidh
Vikramsinh, Thanks for your response !! SHRIRAM AMBADNYA NATHSAMVIDH !!
Deleteप्रिय काका, तुझे लेख नेहमी च बोलके असतात... तुझी लिखाण शैली इतकी प्रभावी आहे की लेख वाचताना चित्र डोळ्यासमोर उभे राहते...त्यातून हा लेख तर खुद्द रांगोळी कलाकृती वर असल्यामुळे ..फोटो /चित्र ना पाहता च तू रेखाटलेल्या रांगोळी ची प्रतिमा डोळ्यासमोर आली असती ह्यात शंका नाही. तुला उत्तम रांगोळी ही काढता येते ���� ...क्या बात है.... लेखनाच्या माध्यमातून तुझे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कळते... तुझ्यातल्या कलाकाराला माझा नमस्कार ����. अवंती प्रभुदेसाई- कात्रे
ReplyDeleteतुमचे एक एक ब्लॉग म्हणजे तुमच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू आहेत. खरोखरच लेख वाचताना डोळ्यांसमोर जसाच्या तसा प्रसंग उभा राहतो. - मंजिरी प्रभुदेसाई
ReplyDelete